SOLAPUR

सोलापुरात भीमसैनिकांचा भरउन्हात मोर्चा!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी सोलापुरात भीमसैनिकांनी भरउन्हात काढलेल्या मोर्चाद्वारे केली.

हा मोर्चा आंबेडकर चौक येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळ, सोलापूरच्या व सोलापूर शहर-जिल्ह्यातील भीम सैनिकांच्या वतीने काढण्यात आला होता. या मोर्चात सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिला, युवकांसह अनेक भीमसैनिक सामील झाले होते. चंद्रकांत पाटील या भाजप पक्षाच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्याने तमाम भीमसैनिकांच्या तमाम भारतीय जनतेच्या भावना तीव्रपणे दुखावल्या असून, चंद्रकांत पाटलांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करून त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी याप्रसंगी भीमसैनिकांनी केली.

या मोर्चात यावेळी बाळासाहेब वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, सकल मराठा समन्वयक माऊली पवार, संभाजी आरमार अध्यक्ष श्रीकांत डांगे, माजी सभापती राजन जाधव, माजी सभापती नाना मस्के, रिपाइं नेते प्रमोद गायकवाड, विजयकुमार हत्तुरे, रॉकी बंगाळे, केरू जाधव, अजित बनसोडे, एन के क्षीरसागर, दशरथ कसबे, शांतिकुमार नागटिळक, मिलिंद प्रक्षाळे, बाबा बाबरे, दयानंद बनसोडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!