राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती
सोलापूर (हेमंत चौधरी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती झाली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शिक्षण मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी किसन जाधव यांना जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ दादा पवार यांची विशेष उपस्थिती होती. राज्याचे उपसचिव नि.भा. खेडकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना नियोजन समितीवर संधी देण्यात आली आहे. त्यातच प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना सोलापूर शहराच्या विविध विकास कामांकरिता काम करण्याची संधी आणि मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी दिलीं आहे. किसन जाधव यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नियुक्तीचे पत्र प्रदान केल्यानंतर अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊन सोलापूर शहराच्या विविध विकास कामांकरिता सकारात्मक कामे करण्यासाठी जी संधी आणि जो विश्वास आपण दाखविला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि येणार्या काळामध्ये पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावेळी त्यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी पुणे येथील मामासाहेब मोहोळ प्रशाला पुणे शिक्षण मंडळ जिल्हा पुणे येथे हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी व माणिक कांबळे उपस्थित होते. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटन आणि मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार हे सोलापूर दौर्यावर येत आहेत. त्यानिमित्त या दौर्याचे नियोजन आमदार बबनदादा शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार या दौर्याचे नीटनेटके नियोजन शहर अध्यक्ष संतोष पवार आणि किसन जाधव यांनी करावे. येणार्या काळात पक्ष बळकटीसाठी आपण कार्य करावे, अशा सूचनादेखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना केल्या. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या माध्यमातून माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आज खर्याअर्थाने मला न्याय मिळाला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एक दिलाने काम करू, अशी ग्वाही यावेळी किसन जाधव यांनी दिली. निवडीबद्दल किसन जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.