लखनऊ/ विशेष प्रतिनिधी
उत्तरप्रदेश पोलिसांनी सहारनपूर येथे दोन व कानपूर येथे एका व्यक्तीच्या घरावर बुलडोझर चालवत ही घरे ध्वस्त केली. अलहाबादमध्येदेखील विद्यार्थिनी नेत्या आफरीन फातिमा हिच्या घरावरदेखील बुलडोझर चालविण्यात आला आहे.
महमंद पैगंबर यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ व भाजपच्या पदच्युत प्रवक्त्यांवर कारवाईसाठी मुस्लीम समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झाल्यावरून ही कारवाई केली गेली असल्याचा आरोप होत आहे. तर संबंधित व्यक्तींच्या मालमत्ता अवैध व अतिक्रमित होत्या, अशी माहिती प्रशासन देत आहे. या कारवाईवरून उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Leave a Reply