आमची भूमिका

[vc_row][vc_column width=”2/3″][vc_column_text]पारंपरिक पत्रकारिता एकीकडे कालबाह्य होत असताना, नव्या आणि वेगवान युगाला सामोरे जाणारी पत्रकारिता करण्याचे धाडस अंगी बाणून, ब्रेकिंग महाराष्ट्र या न्यूज पोर्टल व वृत्तवाहिनीची संपादकीय टीम कामाला लागली आहे. पत्रकारितेत अनेक वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क, बातमीदारीचे व्यापक नेटवर्क आणि अत्याधुनिक साधनांचा कौशल्याने वापर करण्याची क्षमता, हे या टीमचे खास वैशिष्ट्य आहे. अनेक दिग्गज आणि वरिष्ठ पत्रकार/संपादक एकत्र येऊन हे न्यूज पोर्टल व चॅनल चालवित आहेत.

वेगवान, धाडसी आणि निर्भीड पत्रकारितेसाठी आम्ही सर्व निश्चितच कटिबद्ध आहोत; या शिवाय, बातमी, माहिती, प्रबोधन आणि मनोरंजन हे वाचकांना देण्यासाठीही आम्ही वचनबद्ध आहोत. यापुढे वाचक वृत्तपत्रे वाचणार नाहीत, तर इंटेरनेटच्या माध्यमातून आपली माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाची भूक भागविणार आहेत. अशा या वाचकांना जे हवे, ते अतिवेगाने देण्याचे काम आमची सर्वोत्तम संपादकीय टीम करणार आहे.

अगदी ताजी बातमी, जग, देश, राज्य व गाव पातळीवरील घडामोडींवर प्रखड भाष्य, विविध क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान आणि खास करून महिला-युवतींसाठी आवश्यक असे उपक्रम ब्रेकिंग महाराष्ट्र टीमच्यावतीने पुरवले जाणार आहेत. बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना अपडेट ठेवण्याचे काम निश्चितच आम्ही करू, आपणही आमचे हे संकेतस्थळ वाचत-पाहत रहा.

धन्यवाद![/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/3″][vc_widget_sidebar sidebar_id=”home”][/vc_column][/vc_row][vc_row vc_row_background=””][vc_column set_as_sidebar=”yes”][vc_column_text]

PUBLIC GRIEVANCES

भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचारसंहिता नियम २०२१) अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council Of India स्वनियमन संस्थेकडे (नियम १८ नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता.

तक्रारीसाठी ई-मेल –
newsportalpublishergrievances@gmail.com

[/vc_column_text][/vc_column][/vc_row]

Back to top button
error: Content is protected !!