चिखली/मलकापूर (तालुका प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक महत्वाचे काय ठरले असेल तर त्या भारतीय जनता पक्षाच्या जाहिराती ठरल्या आहेत. या जाहिरातींतून भाजपने विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे.
आपल्या जाहिरातींच्या व्हिडिओमध्ये भाजपने तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातला. ठराविक विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्या आसपासच्या भागातील मुद्दे यांवर हे व्हिडीओ बनले आहेत. यामुळे मतदारसंघातले रस्ते, पाणीपुरवठ्याचा प्रश्न, वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळाले. भाजपच्या आमदारांनी विकासकामे करत, हे प्रश्न सोडवले. तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्ट कारभार, त्याच्यामुळे मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मिक भाष्य करतात. राज्यपातळीवरच्या मुद्द्यांबरोबरच, तळागाळातले मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवर लोक, भाजपच्या प्रचाराशी अधिकाधिक जोडले जात असल्याचे दिसून आले आहे.
या आणि अशा जाहिराती ठरल्या मतदारांसाठी आकर्षण
विधानसभेसाठी राज्यात उद्या मतदान; साडेचार हजार उमेदवारांचा ठरणार फैसला!