SINDKHEDRAJAVidharbha

उद्या मतदान; १७ उमेदवारांच्या भवितव्याचा मतदार करणार फैसला !

- डॉ.राजेंद्र शिंगणे, मनोज कायंदे, डॉ.शशिकांत खेडेकर यांच्यात काट्याची टक्कर!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबररोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यासाठी निवडणूक टीम सज्ज झाली असून, निवडणूक पथक केंद्रावर पोहचले आहे. उद्या महाविकास आघाडीचे डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे, शिवसेना शिंदे गटाचे डॉ. शशिकांत खेडेकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या सविता मुंढे यांच्यासह १७ उमेदवाराचा फैसला मतपेटीतून मतदार करणार आहेत. मतमोजणी २३ नोव्हेंबररोजी होणार आहे.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात एकून ३ लाख २७ हजार ३४५ मतदार आहेत. मतदान केंद्रांची संख्या ३४० असून १४७७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी ५९७ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ४३ बसेस मधून प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचारी पोहचले असून, उद्याची तयारी आजच करुन ठेवीत आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार मनोज कायंदे, शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे डॉ. शशिकांत खेडेकर, वंचित बहुजन आघाडीच्या सविता मुंढे, स्वतंत्र भारत पक्षाचे दत्तात्रय काकडे, अपक्ष गायत्री गणेश शिंगणे, रामदास कहाळे, डॉ. सुरेश घुमटकर यांच्यात आहे. प्रत्येक उमेदवाराने डोवर टू डोवर जावून मतदानाचा जोगवा मागितला आहे. मतदार आपला मतदानरुपी जोगवा कुणाच्या पारड्यात टाकेल याचा फैसला २३ नोव्हेंबररोजी होणार आहे. अनेक ठिकाणी पैशाचे वाटप सुरु असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. एका एका मतांसाठी कार्यकर्ते मतदारांच्या दारावर टकटक करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे कार्यकर्ते प्रत्येक गावात आहेत. आपल्या मतदान केंद्रावर कसे जास्त मतदान होईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत. तीच परिस्थिती मनोज कायंदे आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी आहे. पुढील निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आहे. नगर परिषद यांच्याही निवडणुका होणार आहे. जर आपल्या पक्षांचा झेंडा आज विधानसभेत फडकला तरच पुढील राजकीय दिशा आपल्याला फायद्याची ठरणार आहे. याचा विचार करून प्रत्येक कार्यकर्ता पायाला भिंगरी लावून पळत आहे. अखेर फैसला मतदारांच्या सकारात्मक निर्णयावर येवून ठेपला आहे.

‘फेक पत्रा’चा खोडसाळपणा अंगाशी येणार?; मनोज कायंदेंना सहानुभूतीची लाट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!