AalandiHead linesPachhim Maharashtra

अलंकापुरीत इंद्रायणी नदी घाटावर छठ पूजा परंपरेने साजरी

- हजारो भाविकांची आळंदीत गर्दी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीय नागरिकांनी महाछठ पर्व परंपरागत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा हजारो उत्तर भारतीय नागरिक, भाविकांनी मोठी गर्दी करून व्रत जोपासले. या प्रसंगी डॉ. नारायण महाराज जढाव, सीताराम महाराज, रामशेठ गावडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, संत तुकाराम साखर कारखाना संचालक प्रविण काळजे, आमदार महेश लांडगे यांचे वडील किसन लांडगे, ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रमुख प्रा. विजय गुळवे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, रोहिदास कदम, माउली घुंडरे,विनोदकुमार मिश्रा, राकेश महातो, श्रीनिवास मिश्रा, राजेंद्र हरिश्चंद्र, राजेश यादव, माजी उपनगराध्यक्ष रामदास भोसले, यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंद्रायणीची आरती व पूजा धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समिती आळंदीचे संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, सुधीरकुमार शर्मा, कृष्ण एस.भारद्वाज, राकेशकुमार महतो, विनोदकुमार मिश्रा, विवेक पांडे, अरविंद सिंग आदी उपस्थित होते.

छठ पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रद्धेने ३ दिवस अनेकांनी निर्जल उपवासासह केली. या पूजेत मावळत्या सूर्य देवाला व सकाळी उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य ( नमन ) करून करण्यात आली. यावेळी छठ वृत्तीचे स्वागत, दीप प्रज्वलन, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्या अर्घ्य, कार्तिकी अन्नदान, प्रात: अर्घ्य, महाप्रसाद वितरण करण्यात आले. या पूजेतून सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना आहे. या छठ पूजा महापर्वाचे आयोजन जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समितीच्या वतीने उद्योजक सुधीरकुमार शर्मा, संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, कृष्णा एस.भारद्वाज, विनोदकुमार मिश्रा, राकेशकुमार महतो यांनी केले. यावेळी आळंदी व दिघी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक सतीश नांदुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी केले. इंद्रायणी नदीघाटावर यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. छठ पूजा महापर्वाचे जगतगुरू शंकराचार्य समितीचे वतीने उत्साहात आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सुधीरकुमार शर्मा यांनी सांगितले. तसेच विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर ‘भव्य काशी गंगा आरती’चे आयोजन करण्यात आले होते. भक्ती भावपूर्ण वातावरणात इंद्रायणी मातेची यावेळी काशी येथून आलेल्या पौरोहित्यांनी विधिवत आरती केली. राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमासह विश्व श्रीराम सेना ही संस्था छठ महापुजा निमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करीत असते. या महोत्सवाची सांगता पहाटे पाच वाजता सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य देऊन होते. सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सूर्याची उपासना करण्यासाठी छटपूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्‍या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. अशी माहिती संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, कृष्णा एस.भारद्वाज, सुधीरकुमार शर्मा यांनी दिली. यावेळी छटपूजा संयोजन जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समितीच्या वतीने उद्योजक सुधीरकुमार शर्मा, संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, कृष्णा एस.भारद्वाज, विनोदकुमार मिश्रा, राकेशकुमार महतो यांनी परिश्रम पूर्वक यशस्वी नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!