श्वेताताईंच्या पाठीशी एकवटल्या गावखेड्यातील मायमाऊल्या!
- मतदारसंघातील 'लाडक्या बहिणीं'ची श्वेताताईंनाच पसंती; मतदानरूपी ताकद ताईंच्या पाठीशी उभी करणार!
– जनआशीर्वाद दौर्यात अनुभवायला येतोय आपुलकीचा ओलावा, अन् ताईंना आशीर्वादासाठी गर्दी!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्याची लेक, हक्काची बहीण, विकासकन्या अशी कितीतरी विशेषणं जनतेने त्यांना दिलीत; कारण सर्वसामान्य माणसाशी त्यांनी आपली नाळ पहिल्यापासूनच घट्ट जोडली, आपले ऋणानुबंध कायमस्वरूपी जुळवले.चिखली मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करणार्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले या महायुतीच्या उमेदवार म्हणून सलग दुसर्यांदा मतदारांचा कौल आजमावत आहेत. निवडणूक प्रचारासाठी त्यांनी काढलेल्या जनआशीर्वाद दौर्यात ग्रामीण भागात गावोगाव श्वेताताई पिंजून काढत असून, प्रत्येक ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत होताना दिसते. विशेषतः लाडक्या बहिणींचा या स्वागतामध्ये केवळ पुढाकारच नसून, आपुलकीचा ओलावादेखील ठायीठायी आढळून येतो.
जिल्हा परिषद सदस्यपदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार्या श्वेताताई महाले यांनी २०१९ मध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार म्हणून चिखली मतदारसंघातून पहिल्यांदाच विजय संपादन केला, आणि आपल्या पहिल्याच कार्यकाळात विकासकामांचा उच्चांक गाठत मतदारसंघातील शहर व ग्रामीण परिसरात प्रगतीचे एक नवे पर्व सुरू केले. या निवडणुकीतदेखील महायुतीच्या उमेदवार म्हणून जनतेसमोर पुन्हा एकदा आपल्या मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आ. श्वेताताई महाले जात असून, त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची श्वेताताईंनाच पसंती मिळेल, याची खात्री पटते. मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, समाज भवन, सभामंडप आदी भौतिक विकासकामांची चौफेर प्रकरणं करत असतानाच श्वेताताईंनी वैयक्तिक लाभाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरदेखील विशेष भर दिला. त्यामुळेच बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सुरक्षा किट असो की, संसार बाटलीचे वितरण असा, पात्र लाभार्थ्यांना या वस्तूंची उपलब्धता त्यांनी करून दिली. लाडकी बहीण योजनेमधून मतदारसंघातील सुमारे ६० हजार लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे कसे जमा होतील, याची काळजी जातीने लक्ष घालून घेतली. आयुष्यमान भारत कार्ड असो, की वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना अशा प्रत्येक योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांशी थेट संपर्क साधून त्यांना या योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आ. श्वेताताई महाले यांनी या अडीच वर्षात केले. या निमित्ताने वेळोवेळी श्वेताताईंचा ग्रामीण भागातील महिलांची सातत्याने संपर्क येत गेला व या संपर्कातून माता-भगिनींशी त्यांची नाळ जुळली, ऋणानुबंध जोडले गेले. श्वेताताई आपल्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची जाणीव ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थी महिलेला असल्यामुळेच त्यांच्याबद्दलचा आपुलकीचा ओलावा महिला मतदारांच्या मनात असून, श्वेताताई गावात आल्यानंतर त्यांच्या हाकेला ओ देत मोठ्या संख्येने माता भगिनी जमा होत असल्याचे गावोगावी पाहायला मिळते.
चिखली विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५७१८ मतदार असून, त्यापैकी महिला मतदारांची संख्या १ लाख ४८ हजार ०५४ एवढी आहे. एक महिला आमदार म्हणून श्वेताताईंनी आपल्या पहिल्याच कारकिर्दीत केलेली भरभक्कम विकासकामे, विधानसभेत मांडलेले जनतेचे प्रश्न आणि एकूणच त्यांचा परफॉर्मर्स पाहत, प्रत्येक महिला मतदाराला आपल्यातील एक भगिनी केवळ चिखलीचेच नव्हे तर महाराष्ट्राचे मैदान गाजवत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. श्वेताताई गावात आल्या की त्यांच्याभोवती जमलेल्या महिलांच्या चेहर्यावरून हा अभिमान ओसंडून वाहत असतो, त्यांच्या डोळ्यातून आपुलकी ओथंबलेली दिसते आणि पुन्हा एकदा श्वेताताईंना आमदार म्हणून विजयी करण्याचा दृढनिर्धार ग्रामीण भागातल्या महिला मतदारांच्या देहबोलीतून जाणवतो.