ChikhaliPolitical NewsPoliticsVidharbha

श्वेताताईंच्या विकासकामांवर मुस्लीम समाजही खूश; ‘काँग्रेसने हमे सिर्फ इस्तेमाल किया’!

- हमारी तरक्की करने वाली श्वेताताई को ही हम वोट देंगे; विकासकामांमुळे मुस्लीम समाजात वाढला श्वेताताईंचा जनाधार!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – ‘काँग्रेसने हमे आज तक केवल मजहब के नाम पर भडका कर इस्तमाल किया. लेकिन हमारी तकलीफे आज तक जैसे की वैसे ही रही, ना हम सुधरे ना हमारे हालात सुधरे. लेकिन श्वेताताईने ढाई साल मे हमे जितना दिया उसकी बराबरी काँग्रेसवाले ६० सालोमे भी नही कर सकते. इसलिये हमारे काम करने वाली हमारी तरफ की करने वाली श्वेताताई को ही हम वोट देंगे.’ असा निर्धार चिखली मतदारसंघातील मुस्लीम महिला व पुरुष मतदार मोठ्या संख्येने व्यक्त करत आहेत. जनआशीर्वाद दौर्‍यानिमित्त ग्रामीण भागात फिरताना मुस्लीम मानसिकतेचा कानोसा घेतल्यावर हा प्रतिनिधिक सूर लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मुस्लीम मतदारांना आपला हक्काचा मतदार म्हणून आजपर्यंत काँग्रेस वागत आली आहे, परंतु पहिल्यांदाच या समाजात परिवर्तनाचे वारे वाहताना दिसत आहेत.

चिखली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले या निवडणूक रिंगणात सलग दुसर्‍यांदा उतरल्या आहेत. त्यांना शहर व ग्रामीण भागात उस्फूर्त पाठिंबा मतदारांकडून मिळत आहे, सध्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जनआशीर्वाद दौर्‍यानिमित्त प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधील गावोगावी श्वेताताई भेट देत असून, सर्व जाती-धर्माच्या नागरिकांकडून त्यांचे उत्साहात स्वागत होताना दिसते. यामध्ये मुस्लीमधर्मीय मतदारांचादेखील सहभाग असल्याचे जाणवते. विशेषतः मुस्लीम युवक आणि महिलांकडून ठीकठिकाणी श्वेताताई महाले यांचे उत्साहात स्वागत केले जात आहे.
एकूण पाच वर्षांपैकी केवळ अडीच वर्षाचा कालावधी विकासकामे करण्यासाठी मिळाला असतानाही आ. श्वेताताई महाले यांनी या अत्यल्प कालावधीचा सदुपयोग मुस्लीम समाजाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करण्यासाठी केला. शासनाच्या विविध योजनांमधून आपल्या मतदारसंघातील मुस्लीम समाजासाठी किन्होळा, धोत्रा भणगोजी, डोंगरशेवली, ढालसावंगी, पेठ, इसोली, सवना, एकलारा, चांडोळ, जांब, अंबाशी, धोत्रा नाईक, मंगरुळ नवघरे, शेलसूर, धाड आणि चिखली येथे प्रभाग क्र. ६ मध्ये शादीखाना बांधकाम, शेलुद येथे मुस्लीम वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक व मुस्लीम कब्रस्तानचे सौंदर्गीकरण, रायपूर येथे सभामंडप बांधकाम, भोरसा भोरसी येथे कब्रस्तानकडे जाणारा रस्ता, शेलसुर येथे कब्रस्तान संरक्षक भिंत, सातगाव म्हसला व तेल्हारा येथे मुस्लीम कब्रस्तानला संरक्षक भिंत, करवंड येथील मुस्लीम कब्रस्तान येथे टिनशेड सभामंडप, पेठ येथे मुस्लीम कब्रस्थान व्यवस्थापन करणे, चिखलीमध्ये प्रभाग क्र. १ मध्ये ईदगाह सुशोभिकरण, प्रभाग क्र. ५ मध्ये बाबु लॉज ते खैरुशाहबाबा रस्ता व प्रभाग क्र. ५, मध्ये खैरुशाहबाबा दर्गासमोर लादीकरण आणि नाली बांधकाम, प्रभाग क्र. ७ मध्ये चिखली न.प. उर्दू प्राथ. शाळा क्र. ५ स्टेज, सुरक्षा भिंत, दुरुस्ती व लादीकरण आणि प्रभाग क्र.१३ मध्ये सांडुबाबा दर्ग्याच्या जागेवर सभामंडपाचे बांधकाम अशी विविध विकासकामे केली. या कामाच्या माध्यमातून मुस्लीम धर्मियांच्या मूलभूत गरजांच्या गरजांची पूर्तता अंधार श्वेताताई महाले यांनी केली असून, महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसच्या आमदाराकडून या मूलभूत गोष्टींकडे दहा वर्षात पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते.


काँग्रेसने केवळ धर्माच्या नावावर भडकावले!

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मुस्लीम समाज सातत्याने काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिला. आपल्या मतांच्या बदल्यात विकासाची अपेक्षा समाजाला होती. परंतु, काँग्रेसने मुस्लीम समाजाची घोर निराशा केल्याचे मत या समाजामधील अनेक ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात. काँग्रेसने आजवर केवळ धर्माच्या नावावर आम्हाला भडकवले आणि आमच्या मतांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेतला. परंतु आमच्या वाटेला फक्त मागासलेपणच आले. शिक्षण, रोजगार, आरोग्य या आमच्या मूलभूत गरजादेखील काँग्रेसच्या कार्यकाळात पूर्ण झाल्या नाहीत. चिखली मतदारसंघात मात्र आता परिस्थिती पालटत असून, आ. श्वेताताई महाले यांच्यासारख्या विकासाची दृष्टी असलेल्या व सर्वधर्मसमभाव जोपासणार्‍या लोकप्रतिनिधीकडून आम्हाला खरा न्याय आता मिळत असल्याचे मुस्लीम तरुण सांगतात. आ. श्वेताताई महाले यांनी लाडकी बहिण योजना, कामगार बांधकाम कामगारांच्या योजना, आयुष्यमान भारत कार्ड अशा प्रत्येक योजनेचे लाभ मुस्लीम समाजातील पात्र लाभार्थी व महिलांपर्यंत पोहोचवण्याचे जे प्रयत्न केले, त्याची दखलसुद्धा मुस्लीम समाजातील महिला मतदार घेत असून, येणार्‍या २० नोव्हेंबर रोजी मुस्लीम समाजातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा हा मोठा वर्ग श्वेताताईंना मतदान करण्याच्या तयारीत आहे. मुस्लीम मानसिकतेचे हे बदलते चित्र खरोखरच आ. श्वेताताई महाले यांच्या न्यायपूर्ण विकासाचे फळ म्हणावे लागेल.

लोकांना विकासकामं करणारा लोकप्रतिनिधी हवा; राहुल गांधीच काय सोनियाजी आल्या तरी चिखलीची हवा पालटणार नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!