-वयाच्या ६५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सामाजिक, सहकार व कृषी क्षेत्रातील योगदानाची आठवण
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : तालुक्यातील हातगाव येथील रहिवासी तथा माजी सरपंच विठ्ठल भाऊराव अभंग (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने हातगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विठ्ठल अभंग हे मनमिळाऊ आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नातेवाईकांसह अनेकांना वेळोवेळी मदतीचा हात दिला. हातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले होते. तसेच श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे काही काळ संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. हातगाव येथे शेवगाव-कांबी मार्गावर त्यांनी नाथ अॅग्रो फार्मर्स कंपनी लिमिटेड तसेच धान्य व कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चाकण येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. नंदकिशोर अभंग यांचे ते सख्खे बंधू, तर हातगाव येथील डॉ. अनिल अभंग यांचे चुलत बंधू होते.