– वाघापूर, अंत्री कोळी, साकेगाव, खोर, माळशेंबा, भडगाव, इरला गावांमध्येही प्रचारफेरीला जोरदार प्रतिसाद!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – पुरूष असो की महिला, वृद्ध असो की युवक, हिंदू असो की मुस्लिम प्रत्येक वयोगटातील आणि समाज घटकातील श्वेताताई महाले यांच्या विकासकार्यावर प्रेम करणार्या चांडोळकरांनी दि. ११ नोव्हेंबररोजी निघालेल्या जनआशीर्वाद रॅलीमध्ये घेतलेला सहभाग, रॅलीदरम्यान जागोजागी श्वेताताईंचे झालेले स्वागत, रॅलीमधून उसळणारा उत्साह हे सर्व चित्र पाहता, चांडोळ येथून आ. श्वेताताई महाले यांना मोठे मताधिक्य मिळेल, यामध्ये आता कसलीही शंका उरली नाही.
चिखली विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार्या आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ जनआशीर्वाद दौरा ग्रामीण भागात सुरू आहे. ११ नोव्हेंबर रोजी या दौर्याची सुरुवात चिखली शहराला लागून असलेल्या भोगावती येथून झाली. वाघापूर, अंत्री कोळी, साकेगाव, खोर, माळशेंबा, भडगाव, इरला या प्रत्येक गावामध्ये प्रचार फेरी काढत आ. श्वेताताई महाले यांनी स्थानिक गावकरी, शेतकरी, महिला, युवक यांच्याशी संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी महाले यांना उदंड असा प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.प्रतापसिंह राजपूत, जिल्हा सरचिटणीस देविदास जाधव जिल्हा, उपाध्यक्ष डॉ. तेजराव नरवाडे, श्रीरंग येंडोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नीलेश गुजर, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा प्रदेश सचिव निर्मलाताई तायडे, भाजपा बुलढाणा तालुकाध्यक्ष एड. मोहन पवार, जे. बी. राजपूत, कृष्णकुमार सपकाळ, विष्णू वाघ, राजूशेठ चांदा, गजानन देशमुख, प्रतापशेठ मेहर, मयूर पडोळ, शंकर तरमळे, साहेबराव गवते, पप्पू राजपूत, एड. संजीव सदार, हरिभाऊ परिहार यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पीरिपा आदी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या दौर्यामध्ये सहभागी झाले होते.
ही जन आशीर्वाद यात्रा सायंकाळी चांडोळ येथे पोहोचली. तेथे आधीच उपस्थित असलेल्या भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात श्वेताताईंचे जोरदार स्वागत झाले. प्रचारपेढीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी सडा टाकून, रांगोळ्या काढून आणि औक्षण करून श्वेताताई महाले यांचे मंगलमय स्वागत केले. अनेक ठिकाणी या प्रचार फेरीवर पुष्पवृष्टीदेखील करण्यात आली.
श्वेताताईंनी चांडोळ येथे केली अभूतपूर्व विकासकामे!
दहा वर्षे आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या विद्यमान उमेदवारांनी चांडोळसारख्या मोठ्या गावात एकही ठोस काम जनतेच्या हितासाठी केले नाही; त्यामुळे चांडोळ व लगतच्या गावातील जनता काँग्रेस उमेदवारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर आ. श्वेताताई महाले यांनी केवळ अडीच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून खेचून आणला व या निधीमधून मूलभूत सुविधांसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे केली. गावात अंतर्गत रस्ते, गाव जोड रस्ते, मंदिरांना सभामंडप, वीज रोहित्रांची उपलब्धता, स्मशानभूमीसाठी निधी, रस्ते खडीकरण, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे बांधकाम, जागोजागी आसन व्यवस्थेसाठी सिमेंट बाकडे, सामाजिक भावनाचे बांधकाम, पुलाचे बांधकाम, जनसुविधा केंद्राची निर्मिती, शेतरस्ते अशा विविध प्रकारच्या कामांमधून श्वेताताई महाले यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असून, चांडोळ येथील रहिवासी श्वेताताईंच्या या कामांबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. आपल्या गावामधून आ. श्वेताताई महाले यांना मोठे मताधिक्य देण्याचा मिळवून देण्याचा विश्वास गावकरी व्यक्त करताना आढळले.