डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्याविरोधात ‘फेक नरेटीव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न!
- मेहकर-लोणार मतदारसंघात स्थानिक उमेदवारांतच खरी लढत!
– डॉ. ऋतुजा चव्हाणमुळे नाही तर उबाठा गटांमुळेच मतविभाजनाचा धोका? – जनमाणसांतील चर्चा
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार व शेतकरी संघटना क्रांतीकारीचा पाठिंबा लाभलेल्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्यात व शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यातच या मतदारसंघात खरी लढत असून, लोकचर्चेनुसार, उबाठा गटाचे उमेदवार सद्या तरी या मतदारसंघात ‘आउट ऑफ रेस’ दिसत आहेत. त्यामुळे ऋतुजा चव्हाण यांच्यामुळे संजय रायमुलकर यांना फायदा होईल, याबाबतचे ‘फेक नरेटीव्ह’ मतदारसंघात हेतुपुरस्सर पसरवले जात असून, त्यामागे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा कानावर येत आहे. मेहकर-लोणार मतदारसंघातून डॉ. ऋतुजाताई यांनाच मताधिक्य मिळणार असून, २३ तारखेला त्याच गुलाल उधळून ‘जायंट किलर’ ठरतील, अशी भावना सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आहेत.
शिंदे गटाचे उमेदवार व उबाठा गटाचे उमेदवार सद्या मेहकर-लोणार मतदारसंघात एकमेकांविरोधात लढत असले तरी, खरी लढत ही ऋतुजाताई चव्हाण व संजय रायमुलकर यांच्यातच आहे. ऋतुजाताई यांच्यामुळे महाआघाडीची मते विभाजीत होऊन त्याचा फायदा रायमुलकर यांना होईल, असे एक ‘फेक नरेटीव्ह’ मतदारसंघात पसरवले जात आहे. या नरेटीव्हमध्ये काहीच तथ्य नाही. उलट उबाठा गटाचे परके उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्यामुळेच ऋतुजाताईंची मते कमी होण्याची भीती असून, खरात यांच्यामुळेच संजय रायमुलकर यांना काय तो फायदा होण्याची शक्यता आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे खासगीत मत आहे. ओबीसी, एससी, एसटी या समाज घटकांसह शेतकरी व कष्टकरी वर्ग हा ऋतुजाताईंना मतदान करण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवाय, मतदारसंघातील रस्ते, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा याची अतिशय दयनीय अवस्था असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक कमालीचे संतप्त आहेत, हे नागरिकदेखील विकासासाठी ऋतुजाताईंच्या पारड्यात आपली मते टाकण्याच्या तयारीत आहेत. मतदारसंघात सद्या सुप्त लाट निर्माण झाली असून, यावेळेस मतदार भावनेच्या भरात मतदान करण्याच्या तयारीत अजिबात नाहीत. तसेच, विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्याविरोधात अॅन्टी इन्कम्बशी मोठ्या प्रमाणात जाणवत असून, त्यांना लोकांनी १५ वर्षे आमदारकी देऊनसुद्धा त्यांना मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलता आला नाही. त्यामुळे नाराज असलेले मतदार आपली मते ऋतुजाताईंच्या पदरात टाकण्याच्या मानसिकेतत आहेत. यावेळेस ‘चेहरा नवा, बदल हवा’ अशी गावोगावी लाट निर्माण झाली असून, उबाठा गटाच्या उमेदवाराला लोकं ‘आउट ऑफ रेस’ समजत असल्याची पारावरील गप्पांतून चर्चा पुढे येत आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी ऋतुजाताईंच्याच पदरात मतांचे दान टाकून, त्यांना किमान लाखाच्या लीडने विधानसभेत पाठवावे, अशी सर्वस्तरातून भावना पुढे आली आहे.
——-