देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व बहुजन समाजाला मान्य; प्रस्थापित राजकारणाविरूद्ध जनतेचा निर्णय!
- अ. भा. मराठा महासंघाचे नेते संभाजीराजे दहातोंडे यांचे प्रतिपादन
– मराठा समाजाला न्याय देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनीच केले!
मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवलेला दणदणीत विजय अत्यंत गौरवास्पद आहे. जनतेच्या विश्वासावर आधारित हा विजय केवळ राजकीय नाही, तर विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या वचनबद्धतेचा आहे. या विजयातून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व बहुजन समाजाने मान्य केले असून, जनतेने प्रस्थापित राजकारणाविरूद्ध कौल दिला आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव व मराठा नेते संभाजीराजे दहातोंडे यांनी केले आहे.
संभाजीराजे दहातोंडे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. ‘लाडकी बहिण योजना’ ही मराठा समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनासाठी ही योजना समाजाला मोठा आधार देईल. याशिवाय, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दाखवलेली संवेदनशीलता सरकारच्या लोकाभिमुख दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. भाजप सरकारने घेतलेले शेतकरी, महिलावर्ग आणि गरीब कुटुंबांसाठीचे निर्णयही विशेष उल्लेखनीय आहेत. शेतकर्यांसाठी मोफत वीज योजना आणि गरिबांना दिलासा देणारी मोफत गॅस सिलिंडर योजना यामुळे ग्रामीण भागाचा विकास गतीने होईल. या धोरणांमुळे जनतेला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत होईल. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने प्रस्थापित राजकारणाला नकार देत, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांना साथ दिली आहे. हा विजय म्हणजे जनतेने प्रगतीचा कौल दिला असल्याचा स्पष्ट संदेश आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे सचिव म्हणून, या विजयाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मराठा महासंघाने नेहमीच समाजाच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे आणि सरकारशी रचनात्मक चर्चा करत समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी महासंघाची भूमिका भविष्यातही प्रभावी राहील. फडणवीस सरकारने यापूर्वी दाखवलेल्या विकासकामांमुळे आणि प्रामाणिक प्रशासनामुळे हा विजय शक्य झाला आहे. आता महाराष्ट्राला एक प्रगतिशील, समतोल आणि सशक्त राज्य म्हणून पुढे नेण्यासाठी ही संधी आहे. शेतकरी, महिला, तरुण, आणि समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा आहे, असेही संभाजीराजे दहातोंडे यांनी सांगितले.
भाजप सरकारने घेतलेले शेतकरी, महिलावर्ग आणि गरीब कुटुंबांसाठीचे निर्णयही विशेष उल्लेखनीय आहेत. शेतकर्यांसाठी मोफत वीज योजना आणि गरिबांना दिलासा देणारी मोफत गॅस सिलिंडर योजना यामुळे ग्रामीण भागाचा विकास गतीने होईल. या धोरणांमुळे जनतेला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत होईल. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने प्रस्थापित राजकारणाला नकार देत, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांना साथ दिली आहे. हा विजय म्हणजे जनतेने प्रगतीचा कौल दिला असल्याचा स्पष्ट संदेश आहे.