Breaking newsBuldanaHead linesPachhim MaharashtraSOLAPURVidharbha

बुलढाणा झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची सोलापूरला बदली

– सोलापूर झेडपीच्या सीईओ मनिषा आव्हाळे यांची पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओ म्हणून बदली
– अभिनव गोयल हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी; सतिश खडके बीड झेडपीचे नवे सीईओ

पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, बुलढाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे, तर बुलढाण्याचे सीईओ पद तूर्त रिक्त ठेवण्यात आलेले आहे. आजच्या बदल्यांत आयएएस अधिकारी अभिनव गोयल, विनायक महामुनी, सतीशकुमार खडके, सौम्या चांडक, कुलदीप जंगम आणि प्रदीपकुमार डांगे यांची बदली करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आली असून, त्यांच्या गुणवत्तेची दखल घेऊन त्यांना पदभारासह बदली करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे ते लवकरच पुण्यतील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचा पदभार स्वीकारणार आहेत. तर सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कुलदीप जंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जंगम हे बुलढाणा येथे याच पदावर कार्यरत होते. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
———-

आज झालेल्या बदल्या –

– अभिनव गोयल यांची नियुक्ती हिंगोलीच्या जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली
– विनायक महामुनी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर करण्यात आली
– सतीशकुमार खडके यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड या पदावर करण्यात आली
– सौम्या शर्मा चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी नागपूर या पदावर करण्यात आली
– मनिषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, पुणे या पदावर करण्यात आली
– कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या पदावर करण्यात आली
– प्रदीप कुमार डांगे यांची नियुक्ती आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई या पदावर करण्यात आली.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!