BEED

स्वराज्य शक्ती सेनेच्या रोजगार मेळाव्यातून साडेनऊशे बेरोजगारांना मिळाल्या नोकर्‍या!

- सौ. करूणा धनंजय मुंडे यांच्या पुढाराकातून संपन्न रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड (जिल्हा प्रतिनिधी) – तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी स्वराज्य शक्ती सेनेच्यावतीने बीड येथे रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून तब्बल साडेनऊशे बेरोजगार तरूण-तरूणींना नोकर्‍या मिळाल्या आहेत. स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या सौ. करूणा धनंजय मुंडे यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यामध्ये कंपन्यांच्या अल्पप्रमाणामुळे जिल्ह्यातील सुशिक्षीत तरूणांच्या हाती कोयता येता. या संकटातून सुशिक्षीत तरूणांना बाहेर काढण्यासाठी विविध नामांकित कंपन्यामध्ये तरुणांच्या हाती काम लागावे, यासाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करूणा मुंडेंनी शुक्रवार (दि.२०) भव्य महारोजगार मेळावा आयोजित करत, जिल्ह्यातील साडे नऊशे सुशिक्षीत तरूणांच्या हाती रोजगार देण्याचे काम केले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मुलाखतीच्या माध्यमातून विविध ठिकाणी तरूणांना रोजगारांच्या नियुक्तीचे पत्र देवून निवड केली. जिल्ह्यातील तरूणांच्या हाती काम लागले तर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होईल, यासाठी करुणा मुंडेंनी महारोजगार मेळावा आयोजित करत तरूणांना रोजगार मिळावून देण्याचे काम केले. यामुळे विविध तरूणांकडून करुणा मुंडेंचे आभार व्यक्त केले जात आहे.

तरूणांच्या सक्षमीकरणासाठी छोटासा प्रयत्न – करूणा मुंडे

जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कुठतरी योग्य मार्ग मिळावा, यासाठी विविध जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांना आमंत्रित करत महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून जिल्ह्यातील तरुणांच्या सक्षमीकरणासाठी छोटासा प्रयत्न करत हाताला काम दिले आहे, असे मत करूणा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!