तळजाई पठार येथे ‘कार्यसिद्धी ‘प्रतिष्ठान’च्या उपक्रमातून वृक्षारोपण
'आपली गौरी, आपली वसुंधरा' मोहिमेला जोरदार प्रतिसाद
कात्रज (पुणे) – कात्रजस्थित कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्यावतीने संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या अभिनव संकल्पनेतून गौरी-गणपती सणानिमित्त ‘आपली गौरी, आपली वसुंधरा’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत कात्रज परिसरातील नागरिकांना घरपोच दिलेल्या रोपांची काल, दि.१९ सप्टेंबररोजी तळजाई पठार, कात्रज येथे नागरिकांच्याचहस्ते लागवड करण्यात आली. गौरी सणानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी गिरीराज सावंत यांचे जोरदार कौतुक केले आहे.
कार्यसिद्धी प्रतिष्ठान हे विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम तर राबवितच असते; परंतु यंदा गौरी-गणपती सणानिमित्त या प्रतिष्ठानचे संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या अभिनव संकल्पनेतून ‘आपली गौरी, आपली वसुंधरा’ ही अनोखी व पर्यावरहिताची मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कात्रज परिसरातील नागरिकांना घरपोच रोपे वाटप केली. तब्बल १० दिवस या रोपांचे नागरिकांनी संगोपन केले, व नंतर दिनांक १९ सप्टेंबररोजी तळजाई पठार, कात्रज येथे उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण केले.
या कार्यक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद तर मिळालाच; पण तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही झाल्याने पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागला. वृक्षारोपणप्रसंगी श्रीकांत चौधरी, अनिकेत पाटील, थोरात गुरुजी, सागर खुटवड, मंगेश भोसले, संजय शिंदे, कृष्णा जाधव, आतिष जाधव, अनंत राजेशिर्के, चंद्रकांत सोनवणे आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.