Pachhim MaharashtraPunePune

शेतकर्‍यांची दयनीय अवस्था पाहता, पुन्हा महात्मा फुलेंनी सांगितलेला ‘शेतकर्‍यांचा आसूड’ उगारण्याची वेळ – डॉ. अमोल कोल्हे

पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे. महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये शेतकर्‍याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण महात्मा फुल्यांनी केले आहे त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचीतही बदल झालेला नाही. त्यामुळे या चुकीच्या शेतीविषयक धोरणांच्या विरोधात हाच आसूड उगारण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. कोल्हे यांनी फुले वाड्यात अभिवादन केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे मोहन जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले लिखित ‘शेतकर्‍यांचा आसूड’ या पुस्तकातील काही भागांचे वाचन केले. डॉ. कोल्हे म्हणाले की, फुल्यांनी शेतकर्‍यांची स्थिती स्वतंत्र भारतात अजून हलाकीची झालेली आहे. महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये ‘शेतकर्‍याचा असूड’ हा ग्रंथ लिहिला. शेतकर्‍याच्या विदारक परिस्थितीचे चित्रण यात करून त्याच्या विकासाचा मार्गही सांगितला आहे. सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन, दूध उत्पादक शेतकरी असो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवण, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणे हेच महात्मा फुले यांना अभिवादन असले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!