आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : विश्वशांती दत्त पदयात्रा श्री संत बाळगिर महाराज स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता व विश्वशांतीसाठी शिवनेरी ते रायगड किल्ल्यापर्यंत दत्तनाम पदयात्रा स्वच्छता अभियान अंतर्गत वढू, श्रीक्षेत्र तुळापूर आणि श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदी घाटासह आळंदी शहरात स्वच्छता अभियान हरिनाम गजरात राबविण्यात आले. या अभियानात ७०० वर वारकरी भाविकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत अलंकापुरीतील रस्ते आळणी इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा नदी घाट स्वच्छता करीत घाट चकाचक करण्यात आला. या उपक्रमाचे परिसरातून स्वागत करीत समाधान व्यक्त करण्यात आले.
या अभियानात प्रभावी स्वच्छता उपक्रम राबविण्यास द.भ.प. विश्ववंदनीय साईनाथ महाराज वसमतकर गावागावात जाऊन दत्त संप्रदायाचे माध्यमातून नामसंकीर्तन, राष्ट्रजागृती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्र कल्याण, यासाठी श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबवित आहेत. यातून शिक्षणाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, रुग्णसेवा, वृक्षारोपण, अन्नछत्र, सामाजिक, राष्टीय सांस्कृतिक एकात्मता आदींचे माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देत पद यात्रा मार्गावर जनजागृती करीत आहेत. संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रेरणेतून स्वच्छता अभियान राबवित असल्याचे साईनाथ महाराज यांनी सांगितले. यावेळी गोविंद ठाकूर तौर, अर्जुन मेदनकर, विश्वेश्वर घनकोट आदी उपस्थित होते. आळंदी येथील नदी घाटावर दुतर्फ़ा स्वच्छता अभियान राबवित स्वच्छता करण्यात आली. आळंदीतून स्वच्छता दिंडीतून जनजागृती करण्यात आली. माऊली मंदिरात श्रींचे दर्शन, वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरांचे पालन करीत मंदिर प्रदक्षिणा आणि आळंदी शहरातील रस्ते तसेच मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. या अभियानामुळे इंद्रायणी नदी घाटावर प्रभावी स्वच्छता झाली. यात ७०० वर भाविक वारकरी सहभागी झाले होते. आळंदीतील नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी श्री साईनाथ महाराज यांचे कार्याचे कौतुक करून अभियानची माहिती जाणून घेत संवाद साधला. यावेळी आळंदीतील सेवाभावी संस्था, व्यक्ती यांना घेऊन माहूर येथे येण्याचे निमंत्रण नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान ला देण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मता विश्वशांती साठी शिवनेरी ते रायगड किल्ल्या पर्यंत दत्त नाम पदयात्रा अंतर्गत मार्गावर स्वच्छता अभियान जनजागृती अभियान राबविले जात आहे. यात शिवनेरी येथून कीर्तनाने या उपक्रमास सुरुवात झाली. बर्मन मार्गावरील जुन्नर व नारायणगाव शहरात देखील स्वच्छता अभियान राबविण्यातआले. मांजरवाडी, वढू , आळंदी तसेच देहू येथे हि ( दि. ११ ) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात आनंद दत्तधाम आश्रमातील साधक, सेवक, वारकरी सहभागी झाले होते. मान, सणसवाडी. पाचाड, रायगड येथे ( दि. १५ ) स्वच्छता अभियानाने सांगता होणार असल्याचे साईनाथ महाराज यांनी सांगितले. आळंदीत श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबविल्या बद्दल आळंदी स्वच्छता अभियानचे मुख्य समन्वयक अर्जुन मेदनकर यांनी आभार मानले.