CrimeHead linesLONAR

समृद्धी महामार्गावरील डिझेलचोरीच्या रॅकेटचा पर्दाफास!

- बिबी पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत मोठ्या शिताफीने आरोपी केले जेरबंद!

– शेळगाव आटोळ, मलकापूर पांग्रा, डौलखेड येथील आरोपींच्या आवळल्या मुसक्या!

बिबी (ऋषी दंदाले) – समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारे मोठे रॅकेट बिबी पोलिसांच्या सतर्कतेने हाती लागले असून, पोलिसांनी मुद्देमालासह आरोपी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहेत. या आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीचा प्रयत्न करताना ट्रकच्या चालकाला जाग आल्याने हे चोरटे पळून जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याने तो वाहनात अडकून पडला होता, तर त्याचे साथीदार हे त्याला जखमी अवस्थेत सोडून पळून गेले होते. परंतु, बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील यांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने सुतावरून स्वर्ग गाठत मुद्देमालासह डिझेलचोरीचे रॅकेट पकडण्यात यश प्राप्त केले आहे.

CG : डीजल चोरों का आतंक, बाईपास रोड में रोजाना वारदात -सविस्तर असे, की आज (दि.१३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग नागपूर-मुंबई लेनवर चेनेज क्रमांक ३१० मांडवा शिवारामध्ये इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्रमांक एम एच १५ इ जी ९५१३ वाहनाचा चालक प्रदिपसिंग जसवंतसिंग मान (वय ३५) रा. लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक हा ट्रक सर्विस रोडवर लावून आराम करीत असतांना, चालक प्रदिपसिंग यास डिझेल टाकीचे झाकण उघडल्याचा आवाज आला. या आवाजाने त्याने खाली उतरुन पाहिले असता, दोन इसम ट्रकचे डिझेल टाकीतील डिझेल चोरी करीत असतांना दिसून आले. चालक प्रदिपसिंग याने त्यांना हटकताच ते त्यांच्या इर्टिगा गाडीत बसून भरधाव वेगाने पळून जात असतांना त्यांची गाडी रोडचे बॅरिअरला धडकून अपघात झाला.

त्याच दरम्यान बिबी पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन चेकिंग अधिकारी नापोकों नितीन मापारी, पोहेकॉ अशोक अंभोरे हे सदर ठिकाणावरुन पेट्रोलींग करीत असतांना त्यांना सदर अपघात दिसल्याने ते अपघातग्रस्त वाहन इर्टिंगा क्रमांक एमएच २८ व्हि ९३१० जवळ जावून वाहनात असलेला चालक यास वाहनाचे बाहेर काढले. त्याच दरम्यान त्यांना सदर वाहनामध्ये प्लॉस्टीक कॅन ठेवलेल्या दिसून आल्याने त्यांना संशय आल्याने त्यांनी जखमी चालक यास विचारपूस केली असता, त्याने सांगितले की, मी व माझे सोबत इतर तीन इसम समृध्दी महामार्गावर डिझेलचोरी करण्यासाठी आलो होतो. आम्ही इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ सर्विस रोडवर उभा असलेल्या एका ट्रकचे डिझेल चोरी करीत असताना ट्रक चालक याने हटकल्याने आम्ही पळून जात असतांना आमचा अपघात झाला, व माझे साथीदार पळून गेले. सदर बाबत पोलिसांनी ठाणेदार संदीप पाटील यांनी माहिती दिल्याने ठाणेदार पाटील यांनी नापोकॉ अरुण सानप यांच्यासह समृध्दी महामार्गावर जावून जखमी चालक ज्ञानेश्वर फकिरबा सोसरे यास विचारपूस करून त्याच्याकडून त्याचे साथीदारांबाबत माहिती घेवुन त्यास मार लागलेला असल्याने उपचारकामी ग्रामीण रूग्णालय बिबी येथे भरती केले.

तसेच फरार आरोपींचा शोध घेत असतांना शुभम दीपक उबरहंडे (वय २५) रा.चिखली हा मलकापूर पांग्रा येथे पळून जाण्याच्या बेतात असतांना मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्यास त्याच्या साथीदारांबाबात विचारपूस केली असता, त्याने सांगीतले की, मो भैय्या नावाचे इसमासोबत आलो होतो. त्यानेच आम्हाला सर्व साहित्य व चोरी करण्यासाठी गाडी पाहिली होती. शुभम उबरहंडे याच्याकडून आरोपी भैय्याचा मोबाईल नंबर घेवून त्याची तांत्रिक माहिती काढून शोध घेतला असता, तो भीमराव दगडू इंगळे रा. मांडवा यांच्या कपाशीचे शेतात तुरीच्या पाट्यामध्ये लपलेला मिळून आल्याने त्याला विजय सुदाम साळवे यांच्या समक्ष ताब्यात घेतले. त्याला भुईला व कपाळाला अपघातामध्ये मार लागून रक्त निघत होतो. त्यास नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव हर्षद ऊर्फ भैय्या पांडुरंग साबळे (वय २३) रा. डौलखेड ता. जाप्रâाबाद जि. जालना असे सांगितले. त्यास ग्रामीण रुग्णालय बिबी येथे आणून त्याच्यावर औषधउपचार करून पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानंतर त्याच्या इतर साथीदारांच्या वर्णनावरुन पोलीस पथकाने शोध घेतला असता, आरोपी संकेत सुनील बोर्डे रा. शेळगाव आटोळ हा मिळून आल्याने त्यास मलकापूर पांग्रा येथून ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

या आरोपींना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी बिबी पोलिस ठाण्यात दाखल तसेच इतरही बर्‍याच गुन्ह्यांची कबुली दिली. गुन्ह्यात चोरी करण्याचा प्रयत्न केलेले दोन कॅनमध्ये असलेले ५० लीटर डिझेल किंमती ४८०० रूपये तसेच एक इर्टिगा वाहन क्रमांक एमएच २८ व्हि ९३१० किंमती ७ लाख रुपये तसेच दोन प्लॉस्टीक नळ्या किमती १०० रुपये ६ रिकाम्या प्लॅस्टीक कॅन किमती ६०० रुपये असा एकूण ७ लाख ५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार एपीआय संदीप पाटील, परमेश्वर शिंदे, अशोक अंभोरे, नितीन मापारी, अरुण सानप, यशवंत जैवळ, रविंद्र बोरे, भारत ढाकणे आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!