Head linesSINDKHEDRAJAVidharbha

‘शिंदी’वासीयांनी लोकवर्गणीतून स्मशानभूमीचा केला कायापालट!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – गावाच्या विकासासाठी युवानेतृत्वाची गरज आहे. युवक संघटीत झाले की, गावाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. याचा अनुभव सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या गावातील युवकांच्या कामातून आला आहे. गावकर्‍यांनी एकदा मनामध्ये ठरवलं तर गावच्या विकासाकरिता गावच्या चांगल्या गोष्टी घडत असतात, हेच शिंदी येथील गावकर्‍यांनी सर्व जाती धर्मातील लोकांनी करून दाखवले आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून स्मशानभूमीचा अक्षरशः कायापालट केला आहे.

शिंदी येथील जुनी स्मशानभूमीमध्ये अगोदर पाय ठेवण्याकरितासुद्धा जागा शिल्लक नव्हती. अतिशय घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. परंतु, कालांतराने तरुण मंडळी एकत्र येऊन गावच्या विकासाकरिता चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. असा विचार त्यांच्या मनामध्ये आला व त्यांनी स्मशानभूमीचा कायापालट करण्याचे ठरवले. कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो त्याला शेवटचा दिवस स्मशानभूमीतच असतो. त्यामुळे गणेश सुरेश खरात, उपसरपंच संदीप विष्णू बंगाळे यांनी पुढाकार घेत स्मशानभूमी सर्वप्रथम स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला. संपूर्ण परिसर स्वच्छ केला. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्याकरता बाकडे असायला हवे म्हणून लोकवर्गणी जमा करायला सुरुवात केली. ज्यांच्या घरातील सदस्य मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ एक बेंच देण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले. त्याला सर्वांनी सकारात्मक निर्णय असल्याची सहमती दर्शवली. त्याचबरोबर स्मशानभूमीमध्ये भगवान शंकराची भव्य दिव्य मूर्तीची स्थापना २६ ऑगस्टरोजी करण्यात आली. बघता महिन्याभरातून जवळपास पावणेदोन लाख रुपये लोक वर्गणी जमा झाली. त्यातून ८० बाकडे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातील ५४ बाकडे बसविण्यात आले आहे, तसेच ५१ हजार रुपयांची भगवान शंकराच्या मूर्तीची स्थापनासुद्धा २६ ऑगस्टरोजी गावकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. अतिशय भव्य दिव्य अशी भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करण्यात आल्यामुळे स्मशानभूमीचे चित्र पलटले आहे.
मूर्ती स्थापनेवेळी परमेश्वर आटोळे, त्याचबरोबर सरपंच साधना अशोक खरात, अशोक खरात, आयुब शहा, शिवसेना जेष्ठ नेते गंभीरराव खरात, केशवराव बंगाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष परमेश्वर खरात, विलास बंगाळे, प्रकाश खोसे, दिनकर तोडे, किरण खरात, अतुल खरात, अमोल खरात, सुनील बंगाळे, अशोक बंगाळे, काशिनाथ बुरकुल, अजय खरात, ज्ञानेश्वर रुस्तम खरात, प्रवीण वैद्य, ज्ञानेश्वर मुरलीधर बंगाळे, दत्ता तोडे, संदीप तोडे, कुळसुंदर, ज्ञानेश्वर भांड, विनोद मार्वेâ, आत्माराम बेलोडे, शिवाजी हरिभाऊ खरात यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!