BULDHANAHead linesVidharbha

हर्षवर्धन सपकाळ यांची राजधानी दिल्लीतच वर्णी; ‘आमदार’कीचा पत्ता कट?

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना पक्षाच्या राजीव गांधी पंचायतीराज संघटनेची राष्ट्रीय जबाबदारी सोपवली असून, त्यांना पुन्हा एकदा पक्षाने नवी दिल्लीतच थांबवून ठेवले आहे. त्यामुळे बुलढाण्यातून आमदारकीसाठी प्रयत्न करणार्‍या सपकाळ यांचा पत्ता कट झाल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठस्तरीय वर्तुळात बोलले जात आहे. बुलढाण्याची जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाला सुटणार असून, तेथून जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांची लढत शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्यासोबत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नियुक्ती पत्र.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची अखिल भारतीय राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दि. २८ ऑगस्टरोजी सदर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. विद्यार्थी दशेपासूनच हर्षवर्धन सपकाळ राजकारण तसेच समाजकारणात सक्रीय राहिले आहेत. सन २००० मध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. या पदाच्या माध्यमातूनही त्यांनी विविध उपक्रम राबवत, एक चांगलीच छाप निर्माण केली होती. काँग्रेसनेते मुकूल वासनिक यांचे बोट धरून राजकारण शिकलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस यासह विविध राज्याचे प्रभारी म्हणूनदेखील सपकाळ यांनी पक्ष संघटनेत चांगले काम केले आहे. राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनदेखील ते काम पाहत होते.
दरम्यान, गेल्या पंचवार्षिकमध्ये ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणूनदेखील निवडून आले होते. आज, दि. २८ ऑगस्टरोजी हर्षवर्धन सपकाळ यांची राजीव गांधी पंचायतीराज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सदर नियुक्ती केली आहे. ज्येष्ठ काँग्रेसने मणीशंकर अय्यर, श्रीमती मीनाक्षी नटराजन यांनीदेखील यापूर्वी सदर संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आहे. सदर नियुक्तीचा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!