ग्रामीण पाणी पुरवठा गाड्याचा ठेका पुन्हा ‘ज्याेतिर्लिंग’लाच; टेंडर प्रक्रियाबाबत संशय?
सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी मागील काही महिन्यापूर्वीच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अनेक गाड्याच्या ठेक्याला धक्का दिला होता. परंतु आता पुन्हा नव्याने १४ गाड्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला लागणार असल्यामुळे टेंडर प्रक्रिया राबविली आहे. मात्र मागील जो ठेकेदार जोतिर्लिंग टुर्स अॅन्ड ट्रॅव्हर्ल्स सोलापूर नावाचा ठेकेदारच यांचे टेंडर घेतल्यामुळे या टेंडर प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ई निविदा पध्दतीने भाडेतत्वावर वाहन पुरवठ्याबाबतची निविदा मागविली आहे. यामध्ये बोलोरो, स्कॉपिओ, एर्टिगा, डिझायर, तवेरा आदी गाड्या भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये प्रति किलोमीटर २ हजार रूपये जिल्हा परिषद संबधित ठेकेदाराला देणार आहे. तर प्रति वाहन महिन्याला ४९ हजार ७६४ रूपये ठेकेदारांना देण्यात येणार आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता, सहाय्यक भुवैज्ञानिक, कनिष्ठ भुवैज्ञानिक, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा आदी तालुक्याला दिल्या जाणार आहेत. या गाड्या पुरवठा करण्यासाठी जोतिलिंग टुर्स अॅन्ड ट्रॅव्हर्ल्स सोलापूर सह चार ठेकेदारांनी ई टेंडरमार्फत टेंडर भरले होते. परंतु तीन ठेकेदारांना या गाड्याचा ठेका मिळाला नसून जोतिर्लिंगला ठेकेदारांनाच हे टेंडर कसे मिळाले? असा प्रश्न इतर ठेकेदारांना पडला आहे. यापूर्वी सीईओ यांनी स्वतः जोतिर्लिंग या ठेकेदारांचा ठेका ताबडतोब रद्द केला होता. मागील वेळाही हाच ठेकेदार जोतिर्लिंग नावाचा मॅनेज करून टेंडर प्रक्रिया राबविली असल्याचा सूर झेडपीत दबक्या आवाजात येत होता. आता पुन्हा यावर्षीचा ठेकाही या जोतिर्लिंग या ठेकेदारालाच कसा काय मिळाला याबाबत संशय निर्माण होत आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी लागणाऱ्या गाड्यासाठी आपण रितसर पध्दतीने टेंडर प्रक्रिया राबविली होती. परंतु चार पैकी जोतिर्लिंग या ठेकेदारांनीच झेडपीच्या सर्व अटी व नियम पाळून टेंडर भरल्याने त्यांना ठेका मिळाला आहे. त्यामुळे मागील वेळी जरी आणि आता जोतिर्लिगला ठेका मिळाला असला तरी तो ठेकेदार सर्व शासनाच्या अटी व नियमाचे पालन करतो.
– सुनिल कटकधोंड, कार्यकारी अभियंता