SOLAPUR

दौरा ठरला! श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी पंतप्रधान मोदी सोलापूरला येणार!

– पंतप्रधानांची जाहीर सभा व रे नगर घरकुल हस्तांतरण सोहळ्याच्या पूर्वतयारी व नियोजन बैठक

सोलापूर (हेमंत चौधरी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी सोलापूरला येत आहेत. त्यांचे श्रमिकांच्यावतीने भव्य जल्लोषात स्वागत करणार येणार आहे. सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान एक लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहे. समाजाच्या सर्व थरांतील, सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत. ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल, असे मत रे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील 30 हजार असंघटीत कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रे (राजीव गांधी आवास योजना) नगर फेडरेशन, म्हाडा यांच्या पुढाकरातून जगातील एकमेव अभिनव अशा 30 हजार घरांचा महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्पातील 15 हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे. याच्या पूर्वतयारी करीता शनिवारी रे नगर कुंभारी येथे नियोजनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण, म्हाडा संबधित सर्व अधिकारी, रे नगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर, रे नगरचे चेअमन नलिनीताई कलबुर्गी, विकासक अंकुर पंधे, माजी नगरसेविका कामिनी आडम आदी समावेत शासकीय बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभा व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा, नकाशा, व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टर द्वारा देण्यात आली.
यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक गिरीष सरदेशपांडे यांनी कुंभारी येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व लाभार्थ्यांना घरांचे भव्य आणि दिव्य हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी भारत सरकार शिष्टाचार प्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री, केंद्रीय रस्ता मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्री, म्हाडा व संबधित सर्व मंत्री अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे व त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले. तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमन साठी हेलिकॉप्टर कोठे उतरले पाहिजे , हेलिपॅड कोठे असले पाहिजे याचे तीन ठिकाणे व सुरक्षा यंत्रणा व ताफा आदी बाबी विचारत घेतली आहेत. यावेळी अव्वर अधीक्षक यावलकर उपअधीक्षक यामवार, अमोल भारती, पोलीस निरीक्षक एल. निंबाळकर, पोलीस निरीक्षक सनगले, उप पोलीस निरीक्षक उस्मान शेख, जिल्हा वाहतूक केंद्राचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, उप अभियंता धनशेट्टी, म्हाडा चे उपअभियंता मिलिंद अटकळे, जिल्हा परिषद चे उपअभियंता बिडला, रमेश राठोड, गजेंद्र दंडी, ॲड.अनिल वासम आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!