LATURMarathwada

स्व. गोपीनाथराव मुंडे जयंती व स्व. शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक लाख बांबू वृक्ष लागवड मोहीम

 

लातूर (योगेश चिद्रेवार) – लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील बांबू वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमीत्त व शेतकर्‍यांचे नेते स्व. शरद जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने १२ डिसेंबर २०२२ रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्याहस्ते रेणापूर तालुक्यातील मौजे रामवाडी (ख.) येथे आयोजित करण्यात आला आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज ओळखून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी आपल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुसार देशाचे माजी ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्राचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमीत्त व आयुष्यभर शेतकर्‍यांच्या हितासाठी लढणारे शेतकरी नेते माजी खासदार स्व. शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ दि.१२ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी करण्यात येणार आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्याहस्ते या मोहिमेचा शुभारंभ होणार असून, या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बांबू लागवड सल्लागार समितीचे राष्ट्रीय सदस्य पाशा पटेल हे उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रम सोमवारी सकाळी १० वाजता रेणापूर तालुक्यातील मौजे रामवाडी (ख़.) येथील हणुमंत कुटवाड यांच्या शेतात आयोजित करण्यात आला आहे. या वृक्ष लागवड कार्यक्रमास रेणापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांसह खरोळा रामवाडी परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक खरोळा जिल्हा परिषद भाजपाचे महेंद्र गोडभरले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!