BULDHANAHead linesPoliticsVidharbha

ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मूत्राभिषेक! केळवदकरांचे जहाल आंदोलन

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भाजपा नेत्याच्या ‘महापुरुषांनी भीक मागून शाळा उभारल्या’ या वक्तव्याचा राज्यात निषेध करण्यात आला. पुण्यात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यामुळे निर्माण झालेले वादंग शांत झाले नसतानाच, आता बुलढाणा जिल्ह्यातील आक्रमक परिवर्तनवादी केळवद (ता.चिखली) या गावाने निषेधाचा कळस गाठलाय! आज, रविवारी गावातील लहान बालकांनी मंत्री चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला मूत्राभिषेक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवाबद्दलच्या लज्जास्पद विधानाने जिल्ह्यातील संतापाची लाट उसळली. मागील दोन महिन्यांपासून वादग्रस्त विधानावर आक्रमक व आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त होणार्‍या केळवदकरानी आज, ११ तारखेला बसथांबा परिसरात असेच आंदोलन करून पुन्हा एकदा जिल्ह्यात गहजब उडवून दिला. वादग्रस्त विधान व शाईफेकमध्ये पत्रकारांना खेचण्याचा प्रयत्न करणार्‍या पाटील यांची प्रतिमा रस्त्यावर ठेवून चारेक वर्षांच्या तीन बालकांनी आळीपाळीने मूत्राभिषेक केला! यावेळी ज्येष्ठानी निषेधाच्या गगनभेदी घोषणा करून मलकापूर जालना राज्य महामार्ग दणाणून सोडला. या आंदोलनात गणेश निकम केळवदकर, नारायण वाणी, नांदूअप्पा, बाजीराव उमाळे, राम हिंगे, गोपाळ वाघमारे, धनु पाटील, विजय ठेंग, अशोक मोहिते, गोपाळ भोसले, विरु यंगड, भगवान अप्पा, किसना गवते, भारत पवार यासह गावकरी निर्भीडपणे अभिषेक आंदोलनात सहभागी झाले.


हा तर सत्तेचा उन्माद

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना संतप्त शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे. यामुळे ते महापुरुषांचा ठरवून केल्याप्रमाणे अपमान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी आता तरी भानावर यावे, असे आवाहन त्यांनी केले. महामानवांचा अपमान करणार्‍यांना प्रतिबंध करण्यासाठी कडक कायदा तयार करण्याची मागणी गणेश निकम यांनी केली.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!