चिखली (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील मेरा खुर्द येथे ईद-ए-मिलादनिमित्त शासकीय विश्रामगृह येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हा सचिव नदीम भाई देशमुख यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरासाठी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेशराव हिवरकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ देव्हडे, तालुका उपाध्यक्ष दीपकभाऊ शिंगणे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील गवई, महेंद्र वाघमोडे, लीलावती फाउंडेशन मेरा खुर्दचे अध्यक्ष गोविंद सुसर, शालेय समिती उपाध्यक्ष जिल्हा परिषद मराठी शाळा मेरा खुर्द नरेश खराडे, सामाजिक कार्यकर्ते गौतम गवई आदींची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिरामध्ये मेरा खुर्द परिसरातील ३४ युवकांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरासाठी आरोग्य अधीक्षक अधिकारी सामान्य रुग्णालय खामगाव डॉक्टर विष्णू मुंडे सर यांची टीम मेरा खुर्द येथे आली होती. शिबिरामध्ये शेख सोहिल शेख शकील, मोहसीन शाह गफार शहा, समीर सौदागर, कैफ अनवर देशमुख, शाहरुख शाहिद शहा शकील खान नाजीर खान, शेख हबीब शेख करीम, सय्यद समीर, सुनील गवई, जुबेर शाह तोफिक, विश्वजीत अवचार, देवेंद्र बावस्कर आदींसह ३४ लोकांनी मेरा खुर्द येथे आज रक्तदान करून गरजुंना आपले रक्त देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आज सर्वात जास्त गरज ही दवाखान्यामध्ये रक्ताची असते, त्याची जाणीव ठेवून मेरा खुर्द येथील युवकांनी ईद-ए-मिलाच्या पावन मुहूर्तावर रक्तदान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे, या उपक्रमाबाबत मेरा खुर्द नव्हे पूर्ण चिखली तालुक्यामध्ये नदीम देशमुख आणि त्यांची टीम यांचे कौतुक होत आहे.