सहकार विद्या मंदिरात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी
विद्यार्थ्यांनी भाषणातून टाकला जीवनकार्यावर प्रकाशझोत
बिबी:- येथील सहकार विद्या मंदिर शाळेमध्ये भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सहकार विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला.
15 ऑक्टोबर रोजी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला होता. त्यांनी त्यांच्या बालपणी भरपूर कष्ट केले. 1960 मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. फायटर पायलट होण्याची त्यांचे बालपणीची स्वप्न होते. पदवीनंतर डी आरडीओ मध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. ते 1969 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO) मध्ये रुजू झाले. अंतराळ विज्ञानातील त्यांच्या कौशल्यामुळे ती भारतीय क्षेपणास्त्र पुरुष म्हणून लोकप्रिय झाले ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते.त्यांच्या जयंतीनिमित्त सहकार विद्या मंदिर शाळेमध्ये कार्यक्रमांमध्ये सहकार शाळेचे मुख्याध्यापक इंगळे, उपमुख्याध्यापक आर. जी. राठोड व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने भाग घेतला.
“स्वप्ने तीन असतात जी आपण झोपेत बघतो तर खरी स्वप्न ती असतात ती आपली झोप उडतात” असे म्हणणारे भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन ओळखतो त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो.
——-