चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार श्वेताताई महाले पाटील या सलग दुसर्यांदा विजयी झाल्यातर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असून, तसे सर्वेक्षण नुकतेच जाहीर झाले होते. त्यामुळे ताईंच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासाची गंगा अशीच वाहती ठेवण्यासाठी गावखेड्यातून श्वेताताईंना किमान एक लाखाचा लीड देण्याचा निर्धार जनमाणसातून समोर येत आहे. दरम्यान, पायाला दुखापत झालेली असतानाही श्वेताताईंनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरूच ठेवल्याने त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेविषयी जनमाणसात आणखीच आत्मियता निर्माण झालेली आहे. आचारसंहिता लागण्याच्या काही दिवसांपूर्वी उत्साही कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात गाडीचे दार लोटल्याने आमदार श्वेताताई महाले यांच्या गुडघ्याजवळ दुखापत झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही चिखली मतदारसंघातील जनतेला विकासाभिमुख, सुसंस्कृत, संयमी, नेतृत्व देण्याच्या उद्देशाने आमदार श्वेताताई महाले या निवडणूक रिंगणात उतरलेल्या असून, प्रचाराचा झंझावात त्यांनी निर्माण केलेला आहे.
आपल्या पहिल्याच टर्ममध्ये कोट्यवधी रूपयांची विकासकामे करणार्या श्वेताताई महाले यांना जनतेने दिलेली विकासकन्या हे पद त्यांनी सार्थ ठरवलेले आहे. पायाला दुखापत असतानाही त्यांनी आपली जनसंवाद यात्रा सुरूच ठेवल्याने त्यांच्याविषयी कमालीची आत्मियता जनमाणसांतून पहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असून, त्यांना १८० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे एक सर्वेक्षण नुकतेच जाहीर झाले होते. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार आले तर सलग दुसर्यांदा विधानसभेत पोहोचणार्या श्वेताताईंना कॅबिनेट मंत्रिपद मिळणे निश्चित मानले आहे. श्वेताताई या निवडून तर येणारच आहेत, पण त्यांना किमान एक लाखाच्या फरकाने निवडून दिले तर कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याला बळकटी येते, त्यामुळे ताईंना लाखाच्यापेक्षा जास्तच मतांनी निवडून देण्याचा जनमाणस गावखेड्यातून पुढे येतो आहे. शिवाय, त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा तालुक्यात आलेली आहे, ती खंडित व्हायला नको म्हणूनही त्यांना मोठ्या मताधिक्यानेच निवडून देण्याबाबत सर्व समाज घटकांत मतैक्य दिसून येत आहे.