Breaking newsBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजाताई चव्हाणांसाठी रविकांत तुपकर सभा घेणार का?

- शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांत उत्सुकता, रविकांत तुपकरांनी मेहकरात सभा घेण्याची मागणी ऐरणीवर!

– चळवळीवरील संशयाचे मळभ दूर करण्यासाठी रविकांत तुपकरांनी डॉ. ऋतुजा चव्हाणांच्या प्रचारात उतरण्याची गरज!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या चळवळीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शेतकरी नेते ऋषांक चव्हाण व डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनी विधानसभेच्या मैदानात उडी घेतल्यानंतर शेतकरी चळवळीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, या चळवळीतील एका शेतकरी नेत्याने संशयास्पदरित्या प्रचार मोहिमेतून अंग काढून घेतले. त्यानंतरही डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनी आपण मैदानात पदर खोचून उभे असून, एकटीच स्वकीय, परकीय आणि राजकीय विरोधकांशी लढणार असल्याचे जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत एकट्या पडलेल्या शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मेहकरात जाहीर सभा घेण्याची मागणी पुढे आली आहे. “आधीच शेतकरी चळवळीवर संशयाचे मळभ निर्माण झालेले असून, लोकं तोंडाला येईल ते बोलत आहेत”. हे मळभ दूर करण्याची संधी तुपकरांना यानिमित्ताने चालून आली आहे. त्यामुळे तुपकरांनी तातडीने डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्यासाठी मेहकरात सभा घ्यावी, अशी मागणी पुढे आलेली आहे.

No photo description available.विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात २५ व बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली होती. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही. ज्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यांनीही नंतर अर्ज मागे घेतले. मेहकरात तुपकरांच्या खांद्याला खांदा लावून शेतकरी चळवळीत काम करणार्‍या डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे तिकीट आणून मैदानात उतरलेल्या आहेत. त्यांना जनमाणसातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रस्थापित नेत्यांविरोधात तेथे त्यांची लढाई असून, तेथे त्या एकट्या पडलेल्या आहेत. सुरूवातीला त्यांच्यासोबत एक शेतकरी नेता सक्रीय झाला होता. परंतु, अचानकपणे व संशयास्पदरित्या या नेत्याने प्रचार मोहिमेतून अंग काढून घेतले असून, त्याबाबत मेहकरमध्ये सद्या उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. No photo description available.तर डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनी मात्र वाघिणीसारखी डरकाळी फोडली असून, हार-जीत महत्वाची नसून, ही नैतिकतेची व मतदारसंघाचा मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठीची लढाई आहे, असे जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत एकट्या पडलेल्या एका महिला सहकार्‍यासाठी धावून जाणे हे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे ते मेहकरात ऋतुजाताई चव्हाण यांच्यासाठी सभा घेतील का, हा प्रश्न आता शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे.


शेतकरी नेते ऋषांक चव्हाण व डॉ. ऋतुजाताई चव्हाण हे शेतकरी चळवळ व रविकांत तुपकर यांच्या विविध आंदोलनातील महत्वाचे सहकारी राहिलेले आहेत. रविकांत तुपकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे ज्यावेळी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी ते मान्यही केलेले आहे. ऋषांक चव्हाण हे सातत्याने शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सोडवत असतात, व त्यांना अडीअडचणीत मदतदेखील करत असतात, लोकसभा निवडणुकीतही त्यांनी रविकांत तुपकर यांचे काम तन-मन-धनाने केलेले आहे. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे जर बाहेरील मतदारसंघात जाहीर सभा घेत असतील तर त्यांनी मेहकर मतदारसंघातसुद्धा स्वतःच्या कार्यकर्त्याला बळ दिले पाहिजे, अशा भावनाही शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत.

स्वकीय, राजकीय विरोधकांना शेतकर्‍यांची ‘वाघीण’ एकटीच भीडणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!