BULDHANAChikhaliHead linesVidharbha

सोयाबीनला ६ हजारांचा भाव मिळणार; पंतप्रधानांच्या घोषणेचे चिखलीत स्वागत!

- शेतकर्‍यांच्या सोयाबीन भावाचा प्रश्न अखेर मोदी सरकारच सोडविणार!

– विरोधकांच्या अपप्रचाराला ब्रेक; सोयाबीन, कापूसप्रश्नी श्वेताताईंनीच उठविला होता आवाज!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदारपणे वाहत आहेत. जिकडे तिकडे प्रचाराची राळ उठलेली आहे. चिखली मतदारसंघसुद्धा याला अपवाद नाही. येथील विकासाची दृष्टी असलेल्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले या सलग दुसर्‍यांदा जनमताचा कौल आजमावत आहेत. श्वेताताईंना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र प्रचारादरम्यान पाहायला मिळत आहे. श्वेताताईंना मिळणारे व्यापक समर्थन पाहून विरोधकांकडून शेतीमालाच्या मुद्द्यावर तो अपप्रचार सुरू होता त्यालादेखील आता चोख प्रत्युत्तर मिळाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना ६ हजार रुपये हमीभाव देण्याच्या घोषणेचे मतदारसंघातील शेतकरी बांधवांकडून मोठ्या उत्साहात स्वागत झाले. त्याचा फायदा निश्चितच श्वेताताई महाले यांना मिळेल, व या माध्यमातून महायुतीला मोठा बूस्टर डोस मिळणार असल्याची स्पष्टपणे जाणवत आहे. विशेष म्हणजे, सोयाबीन व कापूसप्रश्नी सर्वात प्रथम श्वेताताई महाले यांनीच आवाज उठवला असून, त्यांनी शेतकर्‍यांची बाजू अतिशय आक्रमकपणे विधानसभेत मांडेलली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.१२) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मोदी यांनी, देशातील शेतकर्‍याला आम्हाला सशक्त बनवायचे आहे. आम्ही शेतकर्‍यांच्या विकासासाठी काम करत असून सत्ता द्या, महायुतीने सोयाबीन शेतकर्‍यांना ६ हजार हमीभाव देण्याचे वचन दिल्याचे सांगितले. केंद्रातील मोदी सरकार शेतकर्‍यांना किसान शेतकरी सन्मान योजना देत असून, आता महायुतीनेदेखील नमो शेतकरी योजना सुरू केल्याने शेतकर्‍यांना १२ हजार मिळत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत केंद्र व राज्य सरकारकडून मिळत असून, आता सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना सहा हजार रुपये हमीभावदेखील मिळणार असल्याने शेतकर्‍यांच्या आनंदात आणखी भर पडली आहे.


विरोधकांच्या अपप्रचाराला मिळाले चोख प्रत्त्युत्तर!

विधानसभा निवडणुकीदरम्यान गावोगावी श्वेताताई महाले यांनी केलेल्या विकासकामांचा गौरव सुरू आहे. त्यामुळे विरोधी उमेदवाराला पोटशुळ उठत असून, त्यांच्याकडून शेतकरीवर्गाची दिशाभूल सातत्याने केली जात होती. भाजप सरकारकडून सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याचे नॅरेटिव्ह पसरवले जात होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देण्याचा शब्द दिल्यामुळे विरोधकांच्या या अपप्रचाराला आता चोख प्रतिउत्तर मिळाले आहे. शेतकरीवर्गाचा मोठा कल आ. श्वेताताई महाले यांच्याकडे झुकल्याचे पाहायला मिळत असून, महायुतीसाठी हा एक मोठा बूस्टर डोस मानला जात आहे.

पायाला दुखापत तरी श्वेताताईंचा मतदारसंघात झंजावाती दौरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!