Breaking newsMaharashtraMetro CityPolitical NewsPoliticsUncategorized

जेव्हा भाजप सरकार येते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते; परंतु शरद पवारांच्या सत्तेत ते गायब होते!

पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल करत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘विरोधक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, पण भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार शरद पवार आहेत. त्यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराला संस्थानिक स्वरूप दिले, असे सांगून, जेव्हा भाजप सरकार सत्तेवर येते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते, परंतु शरद पवारांच्या सत्तेत ते गायब होते, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. पुण्यात आयोजित भाजप पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शाह यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही तीव्र टीका केली. ‘फेक नरेटिव्ह करून विरोधकांनी थोडाबहुत विजय मिळवला, पण विधानसभेत त्यांचा खोटारडापणा बाहेर पडेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शाह यांनी दावा केला की, २०२४ मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने भाजपच्या नेतृत्वात बनेल. ‘कमळ पुन्हा फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे,’ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. शाह यांनी राहुल गांधींच्या अहंकारावरही टीका केली. ‘२०१४ ते २०२४ या काळातील तीन निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. परंतु, राहुल गांधी यांच्यात अहंकार आला आहे,’ असे शाह म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शहा म्हणाले, ‘स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणणारे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत.’ शाह यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत, ‘जेव्हा भाजप सरकार येते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते, परंतु शरद पवारांच्या सत्तेत ते गायब होते,’ असे शाह यांनी सांगून, शरद पवारांवर टीकास्त्र शाह डागले. दूध पावडर आयातीच्या निर्णयावर टीका करत शाह म्हणाले, ‘आम्ही गेल्या दहा वर्षांत एक ग्रॅमही दूध पावडर आयात केलेली नाही, परंतु दूध पावडर आयातीचा निर्णय हा शरद पवारांचा आहे, अशी टीकाही शाह यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!