आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्षाचे शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ आळंदी शहर शिवसेना व युवासेनेच्यावतीने निषेध फेरी आळंदी शहरात काढत निषेध करण्यात आला. आळंदी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापासून जय भवानी- जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद , उध्दव साहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, ५० खोके – माजलेत बोके अशा घोषणा देत आळंदी शहरात शिवसैनिकांनी निषेध फेरी काढत निषेध करण्यात आला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज महाद्वार चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक येथे घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक उत्तम गोगावले, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक रमेश गोगावले, शिवसेना आळंदी शहर संघटक आनंदराव मुंगसे, आळंदी शहर प्रमुख अविनाश तापकीर, विभागप्रमुख संदिप पगडे, तुषार नहार, उपशहर प्रमुख शशी राजे जाधव, अमित डफळ, राहुल सोमवंशी, मंगेश तिताडे, आशिष गोगावले, संपर्क बालाजी शिंदे, संगिता फफाळ, युवासेना शहरप्रमुख मनोज पवार, उपशहर प्रमुख चारुदत्त रंधवे, अनिकेत डफळ, गणेश नेटके, श्रीपाद सुर्वे, कृष्णा देशमुख, निलेश वाब आदी उपस्थित होते.