पाचोड (विजय चिडे) – शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचे रविवारी (दि.४) अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.१५) बीड येथे अंत्यविधी करण्यात आला. या अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. दरम्यान, मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर चारचाकीने औरंगाबादकडे परतणारे मुख्यमंत्री शिंदे यांनी चहा पिण्यासाठी आपला ताफा पाचोड येथील हॉटेल अमृतसमोर थांबवला. त्यामुळे मुख्यमंत्री यांना पाहण्यासाठी गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, आ. संजय सिरसाठ हेदेखील त्यांच्यासोबत होते. चहापानाचा आस्वाद घेऊन मुख्यमंत्री पुढे रवाना झाले.
विनायक मेटे यांचे अंत्यदर्शन व अंत्यविधी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचा ताफा धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून औरंगाबादकडे जात असताना, रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेटमंत्री संदीपामन भुमरे यांचे मूळ गाव असलेल्या पाचोड येथील हॉटेल अमृत येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबून, येथील कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिंदे यांच्यासमवेत आमदार संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे, पाचोडचे माजी सरपंच अंबादास नरवडे, उपसरपंच शिवाजी भालशिंगे, प्राध्यापक मनोज गटकाळ, भागवत नरवडे, आबासाहेब भुमरे, जिजा भुमरे, हॉटेल अमृतचे संचालक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भोजने, मुरमा येथील माजी सरपंच एकनाथ फटांगडे, उपसरपंच दिनकर मापारी, राहुल नरवडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेऊन औरंगाबाद कडे रवाना झाले.
पाचोड येथील हॉटेल अमृतसमोर चक्क मुख्यमंत्री यांचा ताफा थांबल्याने नेमके काय झाले, हे सुरवातीला कुणाला कळेना. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी हॉटेलमध्ये चहा-नाश्त्यासाठी ताफा थांबवल्याचे समोर आले. मुख्यमंत्री हॉटेलमध्ये चहा घेत असल्याचे कळताच गावाकर्यांनी हॉटेलजवळ मोठी गर्दी केली होती. तर मुख्यमंत्र्यांचे चहा नाश्ता करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल झाले होते.