Marathwada

पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा; औरंगाबाद ग्रामीणचे एसपी मनिष कलवानियांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर!

औरंगाबाद (शिवनाथ दौंड) – औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया हे गडचिरोली येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी एका विशेष मोहिमेत पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांच्या या शौर्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले आहे.
मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण हे सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली येथे कार्यरत होते. दिनांक १८/१०/२०२० रोजी नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना महाराष्ट्र -छत्तीसगढ सीमेवर किसनेली गावाजवळ ६० ते ७० नक्षलवादी असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने मनिष कलवानिया, यांचे नेतृत्वात सी-६० कमांडो पथकासह १५ किलोमीटर घनदाट जंगलात पायी जाऊन सर्च ऑपरेशन राबवले गेले. या दरम्यान, नक्षल्यांनी पोलीसांचे दिशेने जोरदार गोळीबार सुरू केल्याने तेथे प्रत्युतरात पोलीसांनीही गोळीबार सुरू केला. यावेळी मनिष कलवानिया, यांचेसह त्यांचे सी-६० कमांडो पथकाने आपले प्राणाची बाजी लावुन नक्षल हल्ला परतावून लावला. सदर ठिकाणी पोलीस आणि नक्षल यांची ८ तास भीषण चकमक चालली. यामध्ये पोलीसांचा वाढता दबाव पाहून तेथून नक्षली पळुन गेले. सदर ठिकाणाची पाहणी केली असता तेथे ०५ जहाल नक्षलींचे मृतदेह तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारूगोळा, कुकर बॉम्ब, स्फोटके व इतर नक्षली साहित्यही मिळुन आले होते.
या अभियानामध्ये मनिष कलवानिया, तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) गडचिरोली व सोबत त्यांचे सी-६० कमांडो पथकाने यांनी टिपागड दलम, कोरची दलम, आणि प्लाटुन १५ मधील जहाल नक्षलवादीना टिपण्यात यश आले होते. सदर चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवादयावर १८ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. सदर साहसी आणि नक्षल चळवळीला हादरा देणार्‍या शौर्यपूर्ण कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना देशाचे राष्ट्रपती यांचेकडुन ‘शौर्य पदक’ जाहिर करून सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!