पाचोड (विजय चिडे) – नारेगाव-औरंगाबाद रोडवर एनडीपीएस पथकाने सापळा रचून एका व्यक्तीस गांजासह पकडले आहे. त्याच्याकडून ४.२८ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एकूण ५८ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शहरातील एनडीपीएस पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जॉलीबोर्ड कंपनीलगतच्या मोकळया जागेत नारेगाव-औरंगाबाद येथे एक इसम गुगीकारक गांजा (कॅनबीस वनस्पती) नावाचा अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक करण्यासाठी येणार आहे. अशी बातमी देवून कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता व बातमीची शहानिशा करण्याकरिता बातमीदाराने सांगितलेल्या ठिकाणी स्टाफ व पंचांसह पोलीसांनी जावून त्या ठिकाणी सापळा रचला. बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे सदर ठिकाणी एक इसम एका पांढर्या रंगाच्या पिशवीसह दिसून आला. त्यास एनडीपीएस पथकाने पकडले असता, त्याला त्याचे नाव गाव विचारले असता , भारत गगन गागडे , वय -२१ , रा . गल्ली नं .०९ बलुच गल्ली , नारेगाव औरंगाबाद असे सांगीतले. त्याची अंगझडती घेत असतांना त्याचे हातात असलेल्या पांढर्या रंगाच्या पिशवीतुन उग्र वास येत असल्याने त्या पिशवीची झडती घेतली असता, त्यात गांजा ( कॅनबीस वनस्पती ) असल्याचे दिसुन आले . त्याचे ताब्यात असलेल्या गांजाचे वजन काटयावर वजन केले असता , ४.२७ किलो गांजा मिळुन आला व अंगझडतीमध्ये १० हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ५८, हजार ६८८ रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन मिळुन आल्याने नमुद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. सिडको , येथे गु.र.नं. २९४/२०२२ अन्वये कलम एन डी पी एस कायद्या २० ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही . पोलीस आयुक्त डॉ . निखील गुप्ता , पोलीस उप आयुक्त ( मुख्यालय ) अपर्णा गिते , सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , आविनाश आघाव , सहायक पोलीस निरीक्षक , हरेश्वर घुगे , सफो नसीम खान शब्बीर खान , पोलीस अंमलदार विशाल सोनवणे , महेश उगले , धर्मराज गायकवाड , सुरेश भिसे , दत्ता दुभळकर , प्राजक्ता वाघमारे सर्व नेमणुक एन डी पी एस पथक औरंगाबाद व मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचे अभिजित खोतकर , फोटोग्राफर राजेंद्र चौधरी यांनी केली .