शिर्डी (राज सोमवंशी) – आंध्रप्रदेशातील बापटला येथील एका साईभक्ताने ७७० ग्रॅम वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट साईचरणी अर्पण करून आपला नवस फेडला आहे.
एवढेच नाही तर ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताटही देणगी स्वरुपात दिले आहे. अन्नम सतिष प्रभाकर असे या साईभक्ताचे नाव आहे. अन्नम यांची ही देणगी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी स्वीकारली आहे.
Leave a Reply