पाचोड (ब्रेकिंग महाराष्ट्र) – पैठण तालुक्यातील मुरमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पत्रकार विजय चिडे यांनी वाढदिवसावर होणारा वायफळ खर्चाला फाटा देत शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे वाटप करण्यात आली.
या कार्यक्रम सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे, उपनिरिक्षक सुशांत सुतळे, धनराज भुमरे,शिवाजी पाचोडे,युवराज चावरे,अनिस कुरेशी यांनी प्रमुख उपस्थिती. यावेळी सपोनि.गणेश सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना असे म्हटले की,संपूर्ण पृथ्वीतलावर झाडांपासून सर्वात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, परंतु त्याची किंमत आपल्याला नाही, गेल्या वर्षभरात अनेकांना ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली, काही ठिकाणी तर पैसे असूनसुद्धा ऑक्सिजन मिळाला नाही, त्यामुळे अनेकांना आता ऑक्सिजन व झाडांचे महत्व कळाले आहे. या पुढील काळात असे संकट येउ नये व पर्यावरणाचा देखील समतोल राखला जावा, याकरिता वृक्ष लागवड व संवर्धन गरजेचे आहे,प्रत्येक गावात एका कुटुंबाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले तरी त्यांच्या पुढील पिढीसाठी हे वरदान ठरणार आहे. पत्रकार विजय चिडे यांनी वाढदिवसानिमित्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप हे खरचं कौतुस्पदक आहे, असे यावेळी त्यांनी म्हटले असून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे मुख्यध्यापक उध्दव दराडे यांनी केले तर शुभम चिडे यांनी आभार मानले असून यावेळी तलाठी सीमा राजाळे,पोलिस कर्मचारी नागथान केंद्रे,पोलिस पाटिल विश्वनाथ मगरे,शाळेय समिती अध्यक्ष बाळासाहेब फटांगडे,माजी अध्यक्ष दिनकर मापारी,गणेश नेमाणे,गोपिचंद आहेर, कृष्णा शिंदे,संपत लेंभे,ज्ञानेश्वर थावरे सह शाळेतील शिक्षक एकनाथ कोलते,शिवाजी वैद्द्य,संदीप बहीर,शिक्षिका आम्रपाली सोनवणे, शिवनंदा पोपळघट, वैशाली सोनवणे सह आदी गावकरी उपस्थित होते.