Uncategorized

बालकासाठी स्तनपानाचे महत्त्व!

भारतात १ ते ७ ऑगस्ट हा जागतीक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो.  स्तनपान सप्ताह 2022 ची थीम “स्तनपानासाठी स्टेप अप: शिक्षित आणि समर्थन” हि आहे.  स्तनपान ही बाळासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो.  पण बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.  कारण चुकीच्या पद्धतीने / तंत्रामुळे मातेला पाठदुखी, स्तनांना सूज येऊन त्यात रक्त किंवा पाणी साठणे, ताप येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.  तसेच बाळांना कुपोषण होऊ शकते, परिणामी अनेकदा संसर्ग होतो.
बालकाला लहानपणी स्तनपान जर व्यवस्थित झाले नाही तर बालक कुपोषित होऊ शकते. बालक कुपोषित झाले तर कालांतराने त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्याचा सर्वांगीण विकास थांबल्यानंतर बालकाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये त्याची जी विकासाची अवस्था आहे, ही विकास पूर्ण होऊ न शकल्यामुळे त्याला पूर्ण आयुष्यभर कुपोषित राहते. स्तनपान ही बाळासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो. पण बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने / तंत्रामुळे मातेला पाठदुखी, स्तनांना सूज येऊन त्यात रक्त किंवा पाणी साठणे, ताप येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळांना कुपोषण होऊ शकते, परिणामी अनेकदा संसर्ग होतो. त्यामुळे आईला ज्या स्थितीमध्ये आरामदायी वाटत असेल, त्या स्थितीत तिने स्तनपान द्यावे. त्यावेळी तिच्या पाठीला आधार असणे महत्त्वाचे आहे. स्तनपान देण्यासाठी भारतीय पद्धत, क्रेडल पद्धत, मॉडिफाइड क्रेडल पद्धत प्रचलित आहे. आडवे पडून बाळाला स्तनपान देऊ नये, हा एक गैरसमज आढळतो.  सामान्य प्रकृती असलेल्या बाळाला जन्मानंतर तीस मिनिटांच्या आत आईच्या पोटावर किंवा छातीवर ठेवावे. त्यामुळे बाळाला उब मिळते आणि स्तनपान करण्याची संधी मिळते.  स्तनपान जेवढ्या लवकर सुरू होईल, तेवढ्या लवकर आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतो.
आईने बाळ रडेपर्यंत थांबण्याऐवजी संकेत समजून स्तनपान देण्यास प्रोत्साहन द्यावे. बाळाला आईचे दूध सुरू असेपर्यंत वेगळे पाणी पाजण्याची गरज नसते.  दूधातून बाळाला अधिक प्रमाणातील लॅक्टोज, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि पाणी मिळते. त्यामुळे त्याची तहानही भागते. हे घटक अग्रभागातील दूधातून मिळतात.  मागील भागातील दुधात स्निग्धांश मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे बाळाची भूक भागते. बाळाच्या सुदृढ वाढीसाठी हे आवश्यक असते. त्यामुळे बाळाची इच्छा असेपर्यंत त्याला स्तनपान द्यावे. स्तनपानामुळे बाळाची तहान आणि भूक दोन्ही भागते. जेव्हा बाळ जेव्हा आईपासून विलग होते, तेव्हा बाळाची तहानभूक पूर्ण झाली आहे, असे समजावे.

स्तनपान पूर्ण झाल्यावर बाळाला ढेकर देण्यास मदत करावी. कारण सगळीच बाळे स्तपान करताना हवाही पोटात घेतात. बाळाला उभ्या स्थितीत कडेवर घ्यावे किंवा मांडीवर बसवावे आणि पाठीवर हात फिरवावा किंवा हलकेच चापटी मारावी. ही क्रिया पार पाडली नाही, तर बाळाच्या पोटातील अतिरिक्त हवेमुळे उलटी होऊ शकते. तसेच हवा आतड्यापर्यंत पोहोचली तर बाळ अस्वस्थ होऊ शकते.

  • हे लक्षात ठेवा-
    – बाळाचे तोंड पूर्ण उघडले पाहिजे.
    – बाळाच्या हनुवटीचा स्पर्श स्तनाला व्हावा.
    – बाळाचा खालचा ओठ हा बाहेरच्या बाजूला वळलेला असावा.
    – या स्थितीमध्ये बाळाचे पूर्ण शरीर आईच्या समोर असावे. बाळाचे डोके, मान यांना शरीराच्या एका रेषेत आधार मिळावा.
    – परिणामकारक स्तनपानासाठी बाळ जन्मापासून आई बाळाच्या जवळपास असणे अपेक्षित आहे.

स्तनपानामधील अडथळे
– आईला स्तनपानात स्वारस्य नसणे, अति अस्वस्थता वाटणे, स्तनाग्रांना भेगा पडणे, सूज येऊन त्यात पाणी साचणे
– हवा बाळाच्या पोटात गेल्यामुळे आलेला अति दाब, दुभंगलेले ओठ किंवा जबड्यांसारखे जन्मजात व्यंग असल्यास बाळाला स्तनपान करताना अडचणी येतात. हे टाळण्यासाठी बालकाला स्तनपान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुरुवातीचे सहा महिने हा महत्त्वाचा काळ आहे. स्तनपान करण्याच्या चुकीच्या पद्धती किंवा काही गैरसमज यामुळे बालक कुपोषित राहतात असे निदर्शनास आलेले आहे.

(डॉ. दादासाहेब खोगरे हे कृषी विज्ञान केंद्र, तडसर, ता. कडेगाव जि. सांगली येथे विषय विषेशज्ञ आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!