MaharashtraPachhim Maharashtra

सव्वाकोटीचा अपहार; वनरक्षकासह आठ जणांवर गुन्हे

पंढरपूर (शिवनाथ दौंड)  : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेत खोट्या सह्या अंगठे करून, बनावट कागदपत्रे तयार करून १ कोटी २५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी वनरक्षक, वनक्षेत्रपाल, वनमजुरासह इतर पाचजणांविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.  वनरक्षक संतोष महालिंग नवघरे वनक्षेत्रपाल किशोर सुभाष आहिरे वनमजूर आंबण्णा सिद्राम जेऊरे व इतर पाच कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक वनीकरण विभागाने ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविली होती.  त्यानुसार पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथील सामाजिक वनीकरण विभागामार्फत शहर व तालुक्यातील प्रमुख रस्ते, मैदाने, झाला आहे.  महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरात दुतर्फा वृक्षलागवड करण्याचे नियोजन झाले.  मात्र ही योजना शासनाच्या नियमाप्रमाणे न राबविता तत्कालीन वनरक्षक महांिलग नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर आहिरे, वनमजूर आंबाण्णा जेऊरे यांनी संगनमत करून अनेक ठिकाणी अर्धवट झाडे लावली.  या योजनेवर मजुरीसाठी कधीही उपस्थित नसणारे मजूर दाखविले. प्रवीण जाधव, जयशिंग नागणे, अभिजित गायकवाड, प्रताप गायकवाड, अनिल गायकवाड, राणी गायकवाड, मयूर गायकवाड, वनिता दनवले, स्वाती दणवले, लक्ष्मण साळवी यांनी बनावट मजूर दाखवून त्यांच्या नावे बनावट दस्त तयार केला.  त्यांच्या सह्या न घेता व्हाऊचर केले, बोगस सह्या, अंगठे करून १ कोटी २५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  या प्रकरणी आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण (पटवर्धन कुरोली) यांनी वरिष्ठ अधिकान्यांना पुरावे माहिती दिली होती.  या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती.  यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार १ कोटी २५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!