चिखली (तालुका प्रतिनिधी) – भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येक नागरिकाच्या घरावर व सरकारी कार्यालयावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे तिरंगा ध्वज फडकवायचा आहे. याकरिता चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व नेहरू विद्यालय यांच्याकडून जनजागृतीसाठी प्रभात फेरी करण्यात आली होती.
या प्रभात फेरीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मुला-मुलींनी तयार केलेले फलक, बॅनर मुला-मुलींनी गावातून घोषणा देत, गावकर्याचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नेहरू विद्यालय मुख्याध्यापक रामेश्वर खेडेकर व मराठी पूर्व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष खेडेकर, परिहार सर, शाळा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, अंगणवाडी सेविका, सर्व शिक्षक वृंद सर्वांनी या वेळेस स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरविले आहे.
Leave a Reply