Chikhali

स्व. सुभद्राबाई वाघ यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने शालेय साहित्य वाटप

मेरा बु , ता. चिखली (प्रतिनिधी) :  जवळच असलेल्या बायगाव बु. येथील स्व. सुभद्राबाई त्र्यंबक वाघ यांचे प्रथम पुण्यस्मरण स्थानिक जि. प. शाळेत वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय साहित्य देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देत साजरे करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ. विमल भास्कर आंधळे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सौ कविता शिवानंद थोरवे, केदार सर, विजय राठोड पत्रकार गजानन कायंदे श्रीराम खरात, शंकर नागरे, सौ. उषा दिलीप , वनवे कैलास आघाव, संतोष नागरे (अध्यक्ष शा.व्य.समिती) राजू खरात (उपाध्यक्ष), हे होते. सदर कार्यक्रमा मध्ये आबाराव वाघ, सोनाजी वाघ उत्तम वाघ व रामभाऊ वाघ यांच्या , हस्ते जि. प. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले.  त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. आपल्या आईच्या स्मृती सतत तेवत राहाव्यात .  या उद्देशाने त्यांच्या मुलांनी पुण्यस्मरण निमित्त राबविलेला हा उपक्रम खरच कौतुकास्पद व समाजातील इतरांनी आदर्श घ्यावा असा आहे, असे मत सेवानिवृत्त केंद्र प्रमुख एकनाथ केदार सर यांनी व्यक्त केले. या वेळी आडे सर, रसाळ सर, मानवतकर सर, नागरे मॅडम, खेत्रे मॅडम, कायदे मॅडम, द्रौपदी सानप, भास्कर आंधळे, शिवानंद आंधळे, देवानंद कायंदे, दिपक वाघ, संजय उत्तम वनवे, दत्ता नागरे , कारभारी आंधळे, मंगेश राठोड, विजय चव्हाण, विजय नागरे, विठोबा राठोड , अरुण आघाव, अंबादास राठोड, कडुबा आडे, गजानन थोरवे, अमोल राठोड शिवानंद नागरे, यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते . सदर कार्यक्रमाचे संचालन पडघान सर यांनी तर आभार प्रदर्शन गवई सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!