आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची पुढील एक वर्षासाठी उपस्थित विश्वस्त मंडळाचे उपस्थितीत झालेल्या मासिक बैठकीत सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
पुणे येथील संस्थांचे कार्यालयात विश्वस्त मंडळाची बैठक झाली. यावेळी विश्वस्त डॉ. अभय टिळक, लक्ष्मीकांत देशमुख, ॲड.विकास ढगे पाटील, योगेश देसाई उपस्थित होते. एक विश्वस्त जागा रिक्त असून एक विश्वस्त डॉ. नरेंद्र वैद्य बैठकीस उपस्थित नव्हते. ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी आळंदी – पंढरपुर सोहळ्याचे पालखी सोहळा प्रमुख आणि प्रमुख विश्वस्त म्हणुन देसाई यांनी यापूर्वी जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली आहे. त्यांचे कामकाजाचे कौतुक वारकरी संप्रदायातुन आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. योगेश देसाई हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक असुन देसाई आंबेवाले या पेढीचे ते मालक आहे. देसाई यांनी यापूर्वी दोन वेळा पालखी सोहळा प्रमुख आणि एक वर्ष प्रमुख विश्वस्त म्हणुन जबाबदारी पार पाडली आहे. आता त्यांची प्रमुख विश्वस्त म्हंणून फेरनिवड करण्यात आली आहे.
प्रमुख विश्वस्त म्हणून झालेल्या फेरनिवडीने त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून भाविक, वारकरी यांना आळंदीत तसेच पालखी सोहळ्यात विविध सेवा सुविधा देण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे आळंदीकर ग्रामस्थ व ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास आळंदीकर नागरिकांचे वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या.