पाचोड (ब्रेकिंंग महाराष्ट्र) – पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागतर्फे डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या उत्तुंग कार्यावर प्रकाश टाकताना म्हटले की, माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन यांनी देशाला एक नवीन दिशा दिली व 2030 पर्यंत भारत हा जागतिक महासत्ता होईल असे स्वप्न पाहिले व भाकित केले . त्यांनी त्या दिशेने भारतातील तरुण /युवा पिढीला जोमाने व वैज्ञानिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणे अपेक्षित आहे, असे उपस्थितततांना आव्हान केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले . या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.विलास महाजन यांनी केले . याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.