कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 चे अनुषंगाने कर्जत तालुक्यातील 10 गणांची आरक्षण सोडत दि. 28 जुलैराेजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय कर्जत येथे काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 12 उपकलम (1) तसेच कलम 58 (1) (अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे. तसेच आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करुन त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील दहा पंचायत समिती गणामधील ज्या रहिवाशीं व्यक्तीची यावेळी उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्यांनी वरील नमूद वेळी व ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले आहे. दि 28 जुलै रोजीच जिल्हा परिषद गटाचे आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येणार आहे. पंचायत समिती गणातील काढलेल्या आरक्षणा बाबतच्या हरकती दि 29 जुलै ते 2 ऑगष्ट दरम्यान तहसीलदार यांच्याकडे घेता येणार आहेत.