कर्जत (प्रतिनिधी) – श्री स्वामी समर्थ जयंती निमित्त कर्जत येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कर्जत तालुक्यातील सर्व केंद्राच्या वतीने कर्जत येथील संत श्री गोदड महाराज जन्म मंदिर व ध्यान मंदिर असलेल्या पाटीलगल्ली येथे ११ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान अखंड नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि ११ एप्रिल रोजी अखंड नामजप या सप्ताहाची सुरुवात झाली. या सप्ताहामध्ये दररोज विविध यागाचे आयोजन केले जाणार आहे. या धार्मिक कार्यक्रमामध्ये ७५ महिला सहभागी झाल्या असून, गुरुचरित्र वाचन, श्री स्वामी समर्थ चरित्र वाचन, दुर्गा सप्तशती, मल्हार सप्तशती, व इतर ग्रंथाचे वाचन होणार आहे.
श्री स्वामी समर्थ अखंड नाम, जप, यज्ञ, सप्ताह मध्ये मंगळवार दि. ११/०४/२०२३ ग्रामदेवता मानसन्मान, यज्ञभूमी पूर्वतयारी, बुधवार दि. १२/०४/२०२३ मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, गुरुचरित्र वाचणास सुरुवात. गुरुवार दि. १३/०४/२०२३ नित्यस्वाहा:कार, श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, शुक्रवार दि. १४/०४/२०२३ नित्यस्वाहा:कार, चंडी याग, शनिवार दि. १५/०४/२०२३ नित्यस्वाहा:कार, श्री स्वामी याग, रविवार दि. १६/०४/२०२३ नित्यस्वाहा:कार, श्री गिताई याग, सोमवार दि. १७/०४/२०२३ नित्यस्वाहा:कार, श्री रुद्र याग, मल्हारी याग. मंगळवार दि. १८/०४/२०२३ बली पूर्णाहूती, सत्यदत्त पूजन व अखंड नाम जप – यज्ञ सप्ताह सांगता, असे कार्यक्रम आगामी आठ दिवसात होणार आहेत.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात कुलधर्म, कुलाचार व बाल संस्कार याला विशेष महत्व दिले जाते. चांगली पिढी निर्माण होण्यासाठी लहान वयातच संस्कार केले जातात, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रधान कार्यालयाच्या व परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने सर्व कार्यक्रम केले जातात अशी माहिती देताना स्वत:चे नाव मात्र न छापण्याचे आवर्जून सांगताना आपले काम फक्त सेवा करण्याचे आहे असे म्हटले.