LONARVidharbha

राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या परिमंडळ कार्याध्यक्षपदी संजय खार्डे

बिबी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या अकोला परिमंडळ कार्याध्यक्षपदी संजय खार्डे यांनी नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्री खार्डे हे बिबी (ता. लोणार) येथील वीज वितरण केंद्रात प्रधान तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची बैठक काल, दि.११ रोजी अकोला येथे पार पडली. या बैठकीला राज्य अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे व राज्य सरचिटणीस हाजी सय्यद जहरूद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत संजय खार्डे यांची अकोला परिमंडळ कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. श्रमिक संघ अधिनियम १९२६च्या नियमान्वये कामगारांचे प्रश्न व तक्रारींच्या अनुषंगाने प्रशासनासोबत चर्चा करणे, निवेदने देणे, तसेच आंदोलने, संप, धरणे आदींचे आयोजन व नियोजन करणे, मध्यस्थी करून तोडगा काढणे आदी विविध अधिकार संघटनेने संजय खार्डे यांना सोपविलेले आहेत.

संजय खार्डे यांच्या या महत्वपूर्ण नियुक्तीबद्दल बिबी महावितरण कार्यालयाचे जेई श्री राजगुरू, तसेच खार्डे यांचे सहकारी, मित्र परिवार यांच्यासह ब्रेकिंग महाराष्ट्र परिवार व विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. संघटनेतील कामाची पावती खार्डे यांना या नियुक्तीने मिळाली असल्याच्या प्रतिक्रिया महावितरणमध्ये उमटत आहेत.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!