शैक्षणिक- सामाजिक- प्रबोधनात्मक कार्यक्रमांची बरसात; सम्राट अशोक- फुले- आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने कार्यक्रमांना प्रारंभ
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – चिखली येथे फुले- आंबेडकर वाटिकेत रविवार ९ एप्रिलपासून सम्राट अशोक- फुले- आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने कार्यक्रमांना शानदार प्रारंभ झाला. दररोज विविध कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत.
रविवार ९ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता धम्म ध्वजारोहण व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली, तर सायंकाळी सात वाजता प्रियदर्शी सम्राट अशोक लोक कल्याणकारी राज्यकर्ता या विषयावर माजी गटशिक्षण अधिकारी बी ओ बोर्डे व राजेश साळवेसर यांनी शिवकाळातील महार मावळे आणि स्वतंत्र भारतातील महार रेजिमेंटचा इतिहास मांडला. सोमवार १० एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता संविधान प्रचारक राजेश गवई सर व पी एस खिल्लारे सर यांनी मार्गदर्शन केले. व शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले. सायंकाळी सात वाजता फुले आंबेडकर विचार आणि तत्व या विषयावर प्राध्यापक डॉ सुरेश शेळके परभणी यांनी व्याख्यान दिले. मंगळवार ११ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या पुतळ्यास समितीचे अध्यक्ष एस एस गवई, राजू खंडारे संगमित्राताई कस्तुरे, जयाताई आराख यांचे हस्ते हार अर्पण करण्यात आला. आणि अभिवादन करण्यात आले. तर यावेळी पत्रकार संजय निकाळजे तथा तलाठी जाधव यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. सायंकाळी सात वाजता स्थानिक क्रीडा संकुल मैदानावर रमाकांत भालेराव दिग्दर्शित स्टॅच्यू ऑफ लिबर्टी शाहू, फुले, आंबेडकर चळवळीवरील नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. याप्रसंगी उपरोक्त सर्वच कार्यक्रमासाठी एस एस गवई सर, बाळासाहेब भिसे, पी एस खिल्लारे सर, इंजी एन के सरदार, एड राजू जाधव, दयानंद निकाळजे, सुधीर जाधव ,विलास घोरपडे, प्रकाश साळवे, दिगंबर पवार, विणकर बाबूजी, संजय जाधव ,मधुकर गवई, रघुनाथ भंडारे, विकास कस्तुरे, प्रशांत डोंगरदिवे, सुशील राऊत, मिलिंद भंडारे, किशोर बोर्डे, मिलिंद मघाडे, समाधान भटकर, रवी वाकोडे, श्रीकांत शिनगारे, प्रशांत डोंगरदिवे रवी राऊत, विपिन इंगळे, विशाल खरात, अविनाश बोर्डे, संजय निकाळजे, संघमित्राताई कस्तुरे, जयाताई आराख, सीमाताई मिसाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
बुधवार १२ एप्रिल रोजी विद्रोही जलसाकार लोकशाहीर संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम तालुका क्रीडा संकुल मैदानावर सायंकाळी सात वाजता होणार आहे. तर गुरुवार १३ एप्रिल रोजी सकाळी दहा ते तीन पर्यंत भव्य रक्तदान शिबिर, सायंकाळी पाच ते सात भीम गीत गायन स्पर्धा, वयोगट पाच ते अठरा व खुला. सायंकाळी सात वाजता भीम गीतांचा आर्केस्ट्रा- स्वराली हा गौतम पहुरे खामगाव यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे.
शुक्रवार १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सकाळी साडेसात वाजता समता सैनिक दल व आजी माजी सैनिक यांच्यावतीने मानवंदना, सकाळी आठ वाजता ऑटो मोटरसायकल रॅली शाम पवार, वसंत अवसरमोल ,सुशील राऊत, रवी राऊत, पवार गरड, सुनील जाधव यांच्या नियोजनात. सकाळी साडेदहा वाजता गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सुरेश कवळे, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे हे राहणार आहेत. यावेळी प्राध्यापक धम्मरत्न वायबळ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांचे व्याख्यान होणार आहे. त्यांचा विषय डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण हा राहणार असून सायंकाळी पाच वाजता वेगवेगळ्या नगरातून शहराच्या मुख्य रस्त्यांनी फुले आंबेडकर वाटिकेपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सम्राट अशोक- फुले- आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.