– कर्जत येथे मुक्त विचारमंचच्यावतीने प्रबोधन उपक्रम
कर्जत (प्रतिनिधी) – देशात ज्या पद्धतीने संविधानिक यंत्रणांची मोडतोड सुरू आहे, यामध्ये इडीपासून अनेक आहेत. म्हणून आज कायद्याचे राज्य आहे का, असे विचारण्याची गरज पडत आहे, म्हणून आज लोकांना निर्भय होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन समाजसेवक विश्वंभर चौधरी यांनी केले. कर्जत येथे मुक्त विचार मंचच्या वतीने कायद्याचे राज्य आणि नागरिकांचा समाज या विषयावर प्रबोधन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. असीम सरोदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरंजन तोरडमल यांनी प्रास्ताविक करताना कर्जत तालुक्यात वैचारिक विचार रुजावेत यासाठी मूक्त विचार मंच काम करणार असून सध्या विविध प्रकारचे मत प्रवाह आहेत त्यावर प्रत्येकाचे मत मुक्त असल्याचे मत मांडले. पाहुण्यांचा परिचय आप्पा अनारसे यांनी करून दिला. यावेळी विश्वंभर चौधरी यांनी बोलताना राज्यातील २१ नेते इडी च्या रडार वर होते पण त्यांनी भाजपात जाताच त्याची इडी चौकशी बंद झाली आता लोकांना इडी च्या अधिकार्यांना भेटून निर्भय बनो हे सांगावे लागणार आहे असे म्हणत, निवडणूक आयोग जिवंत आहे का. नियोजन आयोग मोडून टाकला व निती आयोगाचा खुळखुळा आणला, सध्या कायद्याचे राज्य संपवत असताना आपण लोकांना उत्तरदायी आहोत हेच सद्याच्या राज्य कर्त्याना मान्यच नाही, आज आम्ही भारतीय लोक यांनाच आव्हान दिले गेले आहे. अकरा कोटी च्या राज्याचे सरकार अधिकृत की अनधिकृत हेच या राज्यातील लोकांना माहीत नाही, हा एका राज्याचा प्रश्न आहे. राजकीय उद्धटपणा आला आहे, व तो यापूर्वी कधीही नव्हता, निवडणुकीत धर्माचा वापर वाढला आहे. रामनवमीला डिजे दिसायला लागले आहेत. आपण राम राम म्हणनारे आहोत जय श्रीराम म्हणनारे नाहीत कारण आमचा राम कोणाला भीती दाखवत नाही तो कुटुंबवत्सल आहे. कोणाकडे बाण तानुन उग्र चेहर्याने पाहनारा राम आमचा नाही. आज व्हॉटस?प युनिव्हर्सिटीचे नागरिक तयार झाले आहेत, ते फक्त ग्रामीण भागातीलच आहेत असे नाहीत तर उच्च शिक्षितही आहेत. कारण आपल्या देशात नागरिक शास्त्र योग्य पद्धतीने शिकवले जात नाही. देशात वेशभूषा स्पर्धा सुरू आहे, मात्र देशातील शाळा, आरोग्य व्यवस्था यांना सुधारता आल्या नाहीत, दिल्लीत शाळा सुधारल्या, आरोग्य व्यवस्था सुधारली मग जे काम आपल्याला जमत नाही ते ज्यांनी केले त्यांनाच बदनाम करण्याचे काम केले जाते आहे. २०१४ नंतर घाणेरडी संस्कृती सुरू केली आहे. याविरुद्ध निर्भय बनो ही चळवळ सुरू करावी लागेल आता आपल्यालाच याविरुद्ध उभे राहावे लागेल. आपल्या अस्मितेचे विषय बदलले आहेत, मोठ मोठे पुतळे उभारले की आपल्याला बरे वाटते. आज मोदी राज्यकर्ते बनून आले व व्यापारी बनले अशी थेट टीका पंतप्रधानांवर करताना अनेक बाबी वर प्रकाश टाकला. कायद्याचे राज्य टिकायचे असेल राज्य घटना टिकावी लागेल, ती जर टीकवायची असेल लोकशाही टिकावी लागेल, व लोक शाही टीकवायची असेल तर लोकांना निर्भय व्हावे लागेल असे आवाहन चौधरी यांनी केले.
अॅड. असीम सरोदे यांनी बोलताना न्यायालयाबाबतच्या अनेक बाबी विषद करताना कोर्टात असलेल्या केस वर मालकी कोणाची आहे वकिलांची आहे, न्यायाधीशाची आहे की ज्यांनी केस केली त्याची आहे, कोर्टात पारदर्शकता असली पाहिजे, आपण सगळे न्यायालयाच्या निर्णयाची चिकित्सा करू शकतो, तो चुकीचा असेल तर ते जाहीरपने सांगू शकतो, फेसबुक लाइव्ह करू शकतो त्यामुळे कोणता ही न्यायालयाचा अपमान होत नाही, पत्रकारांनी चुकीच्या न्यायाबद्दल लिहिले पाहिजे तुमच्यावर केस झाली तर आम्ही फुकट लढवू कधी तरी आपण नागरिकत्व जिवंत केले पाहिजे, कुठ पर्यंत आपण भित राहणार, सद्या कायदयाचा गैर वापर करून राज्य केले जात आहे, हे कायद्याचे राज्य आहे का? असे होत असेल तर आपण त्याचे विश्लेषण केले पाहिजे व असे करणारांना घरी बसवले पाहिजे, कायद्याच्या अंमलबजावणीचा अतिरेक केला जात आहे. याविरुद्ध लढणार्या वकीलाची गरज असल्याचे सरोदे यांनी म्हटले. शेवटी कार्यक्रमाचे आभार अनुज काळदाते यांनी मानले.
शहरात वॉर्ड सभा कधी झाल्या असा प्रश्न विचारत लोक गप्प का आहेत, नागरिक तयार झाले पाहिजेत, त्यांनी फक्त शासकीय कार्यालयात प्रश्न विचारले पाहिजेत असेच नाहीत तर सार्वजनिक व्यवस्था वर लक्ष ठेऊन त्यावर जाब विचारणारे लोक तयार झाले पाहिजे, अशी अपेक्षा विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केली.
—————-