Head linesKARAJATPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

कर्जतकरांची किमया न्यारी, दोन्ही आमदारांची साधली बरोबरी!

कर्जत (आशीष बोरा) – कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी दोन्ही आमदारांना समसमान संचालक देऊन किमया दाखवून दिली असून, मतदारसंघाला कोणा एकाची नाही तर दोन्ही आमदारांची गरज असल्याचे दाखवून दिल्याने बहुमताचे दावे-प्रतिदावे करणार्‍या दोन्ही बाजूच्या धुरिणांना विचार करण्यास भाग पाडले आहे. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सत्ताधारी आ. प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार यांनी समोरासमोर पॅनल उभे करून निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण केली होती. दोन्ही पॅनलने विजयाचे दावे केले होते, मात्र मतदारांनी दोन्ही पॅनलचे ९ उमेदवार विजयी केले.

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ९८ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी शनिवारी सकाळी ९ वाजता भाग्यतारा मंगल कार्यालयात सुरू झाली. यामध्ये प्रथम सेवा सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी पार पडली. यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात परस्परविरोधी उमेदवारांना मतदान केल्याने आमदार राम शिंदेच्या कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला ११ जागेपैकी ७ जागा तर आमदार रोहित पवारांच्या सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलला ४ जागा मिळाल्या. यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघाच्या मतमोजणीत रोहित पवार यांनी बाजी मारत ४ पैकी ३ जागा मिळवत निकालात चुरस वाढवली. तर राम शिंदेंना ग्रामपंचायत विभागात अवघी एकच जागा मिळाली. शेवटी व्यापारी-आडत आणि हमाल-मापाडी मतदारसंघाची मतमोजणी पार पडली, यात व्यापारी गटातून पवार यांच्या पॅनलच्या दोन्ही जागा तर हमाल-मापाडी गटातून शिंदेच्या पॅनलच्या उमेदवाराने विजय मिळवत समसमान ९ जागा झाल्याने दोन्ही पॅनलचे प्रमुख काहीसे नाराज दिसत होते. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजपाकडून महिला सेवा सोसायटीच्या उमेदवार लीलावती जामदार व सेवा सोसायटी सर्वसाधारण गटातील उमेदवार भरत पावणे यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दाखल केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक एस. डी. सूर्यवंशी यांनी प्रतिनिधीपुढे मतमोजणी झाली असल्याचे कारण देत प्रत्येक मतपत्रिका तपासण्याची मागणी फेटाळून लावली. दोन्ही पॅनलने जोरदार गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ
विजयी उमेदवार -अभय पाटील ५६६, काकासाहेब तापकीर ५२७, मंगेश जगताप ५०२, संग्राम पाटील ४६०, रामदास मांडगे ४६०, गुलाब तनपुरे ४५९, नंदराम नवले ४५९, पराभूत उमेदवार – भरत पावणे ४५७, रमेश खेतमाळस ४५६, प्रकाश शिंदे ४३३, दादासाहेब अनभुले ४२६, मधुकर घालमे ४२२, संतोष भोसले ३६९, रामचंद्र भोसले ३६२, लालासाहेब सुद्रिक १५, शरद गांगर्डे ०५, हौसराव गांगर्डे ०३.

सोसायटी महिला राखीव मतदारसंघ
विजयी उमेदवार – विजया कुंडलिक गांगर्डे ५१५, सुवर्णा सतिष कळसकर ४७८, पराभूत उमेदवार – लीलावती बळवंत जामदार ४७५, अरुणा जयसिंग थेटे ४२९, सोसायटी इतर मागासवर्गीय मतदारसंघ, विजयी -श्रीहर्ष शेवाळे – ४९५,
पराभूत नितीन पाटील – ४६३. तर सोसायटी विजा/भज मतदारसंघातून विजयी – लहू वतारे ४८६. पराभूत – विजय पावणे ४४५, रमेश व्हरकटे – १६.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ
विजयी उमेदवार – राम कानगुडे ४६३, बळीराम यादव ३७६. पराभूत उमेदवार – सुरेश मोढळे ३६८, किरण पावणे ३३३, केतन पांडूळे ७६. ग्राम पंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून विजयी उमेदवार – वसंत कांबळे ४३५, बाळासाहेब लोंढे ३६८, पूजा जगधने १२. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून विजयी उमेदवार – अमोल पाटील ४३४, संभाजी बोरुडे ३८७.

व्यापारी आडते मतदारसंघ
विजयी उमेदवार – प्रफुल्ल नेवसे ३१५, विजय भंडारी २१५. पराभूत उमेदवार – कल्याण काळे १३८, अनिल भंडारी १०४, रवींद्र कोठारी ८९, किरण सुपेकर १३. हमाल मापाडी मतदार संघातून विजयी उमेदवार – बापूसाहेब नेटके – १५८. पराभूत उमेदवार – जालिंदर काळंगे ९२, महावीर बाफना २३.

  • आ. राम शिंदे पॅनलचे विजयी झालेले उमेदवार – अभय पाटील, मंगेश पाटील, काकासाहेब तापकीर, नंदकुमार नवले, रामदास मांडगे, लहू ओतारे, विजया गांगर्डे, बळीराम यादव, बापूसाहेब नेटके.
  • आ. रोहित पवार पॅनलचे विजयी झालेले उमेदवार – गुलाब तनपुरे, संग्राम पाटील, हर्षल शेवाळे, सुवर्णा कळसकर, राम कानगुडे, वसंत कांबळे, अमोल पाटील, प्रफुल्ल नेवसे, विजय भंडारी.

दोन्ही आमदारांचा जीव टांगणीला!
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपलेच वर्चस्व निर्माण व्हावे, यासाठी दोन्ही आमदारांनी अत्यंत कसोशीने प्रयत्न केले होते. मात्र मतदारांनी अत्यंत सफाईदारपणे आपल्या अंगावर आलेला चेंडू योग्य तर्‍हेने फटकावत दोन्ही आमदारांचा जीव टांगणीला ठेवला आहे. आता चेअरमनपदावर कोणाचा संचालक विराजमान होतो, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून राहणार असून, यातून कोणत्या आमदाराचा झेंडा बाजार समितीवर फडकणार तो हे ठरणार आहे. यासाठी दोन्ही आमदार कोणते हातखंडे अवलंबतात हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!