आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषद हद्दीतील आळंदी स्मशान भूमीच्या विकासाला खीळ बसली असून गेल्या दोन वर्षां पासून लाखो रुपये किंमतीचे गॅस शवदाहिनी साहित्य स्मशानभूमीत धूळखात पाडून आहे. आळंदी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठिकाणी देखील लोखंडी संरक्षक यंत्रणेची तसेच डक ची दुरावस्था झाल्याने आळंदी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला असल्याची माहिती शहर प्रमुख अजय तापकीर यांनी दिली आहे.
या संदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन दिले असून मुख्याधिकारी केंद्रे यांचे वतीने कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांनी निवेदन स्वीकारले आहे. आळंदी स्मशान भूमी मध्ये शवदायिनी स्थळ दुरुस्ती व अधिकच्या नवीन दोन लोखंडी शव दायिनी जाळ्या विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसे तर्फे आळंदी शहराच्या वतीने निवेदन देऊन या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी सांगितले. शासनाच्या निधीतून आळंदीतील स्मशान भूमीत गॅस शवदाहिनी विकसित करण्यातला लाखो रुपये खर्च करून साहित्य आळंदीत संबंधित ठिकाणी येऊन पडले आहे. गेल्या डिड दोन वर्षां पासून सदरचे साहित्य आणि यंत्रणा धूळखात पडून असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुमारे दहा लाख रुपये निधी यासाठी मंजूर करण्यात आला होता. यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला. मात्र सदरचे काम प्रलंबित राहिल्याने नागरिकांत नाराजी आहे. सदरच्या गॅस शव दाहिनीचे काम तात्काळ हाती घेऊन पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. गॅस दाहिनीचे काम सुरु करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.